लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अमरावती: डिजिटल युगाने आपल्यासोबत अनेक फायदे आणि सुविधा आणल्या आहेत, परंतु फसवणूक करणारे आणि घोटाळे करणाऱ्यांना मोठी संधी देखील मिळवून दिली आहे. अमरावतीत खासगी नोकरी करणाऱ्या ३३ वर्षीय व्यक्तीची २३ लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली. येथील अलहिलाल कॉलनीत राहणारे तक्रारदार खासगी नोकरी करतात. ते गेल्या ६ एप्रिलला यु-ट्यूबवर व्हिडिओ पाहत असताना त्यांना एक जाहिरात दिसली. त्यामध्ये ऑनलाईन चित्रपट पाहिल्यानंतर रेटिंग केल्यास बोनस आणि कमिशन मिळेल, असे सांगण्यात आले.
घरबसल्या कमाईची ही संधी असल्याचे समजून तक्रारकर्त्याने जाहिरातीत दिलेल्या लिंकवर क्लिक केले. त्यांना नोंदणी करावी लागली. तक्रारकर्त्याला चित्रपटांची ३० तिकिटे रेटिंगसाठी मिळाली. रेटिंग दिल्यानंतर या व्यक्तीला पहिल्यांदा ८५० आणि दुसऱ्यांदा ३ हजार ५०० रुपये मिळाले. त्यानंतर या व्यक्तीला वेळोवेळी चित्रपटांच्या तिकिटांचे सेट उपलब्ध करून देण्यात आले आणि प्रीपेड टास्कच्या माध्यमातून रेटिंग देण्यास सांगण्यात आले.
हेही वाचा… अमरावती : ‘तो’ म्हणाला, प्रेम करतो, तिने दिला नकार, नंतर भर वर्गातच..
अज्ञात आरोपीने या व्यक्तीला चार बँक खाती आणि एका युपीआय आयडीवर रक्कम भरण्यास सांगितले. बोनस आणि कमिशनच्या आमिषापोटी महिनाभर संबंधित आरोपीच्या खात्यात रक्कम जमा करीत गेले, पण परतावा मिळाला नाही. अशा पद्धतीने या व्यक्तीची एकूण २३ लाख १ हजार ८७७ रुपयांची फसवणूक झाली.
हेही वाचा… सैन्यदल अधिकाऱ्यांच्या गणवेशात होणार बदल
या व्यक्तीने अखेर सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यासह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये बँक खातेधारकाच्या विरोधात गुन्हे दाखल केले.