वर्धा : भारतीय संस्कृतीची जगाला ओढ असल्याचे म्हटल्या जाते. म्हणून त्याचा अभ्यास करण्याच्या प्रेरणा अनेकांना होत असते. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ व केंद्राच्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद यांच्या संयुक्त आयोजनात उद्बोधन वर्गाचे आयोजन आजपासून सुरू झाले आहे.
रामायण, महाभारत, कुटुंब व्यवस्था, विवाह पद्धत, योग,कला,भाषा रचना व अन्य पारंपरिक विषयावर हे वर्ग होत आहे.यात लंडन, मास्को,बर्लिन, बँकाँग,बुडापेस्ट,तेहरान,ताश्कंद व अन्य अशा एकूण २४देशातील विद्यापीठाचे शिक्षक सहभागी होत आहेत.याच उपक्रमात रामटेक,अजिंठा, एलोरा या स्थळी सांस्कृतिक भ्रमण होणार.
विद्यापीठाने सांस्कृतिक परिषदेसोबत केलेल्या सामंजस्य करारानुसार जगभरात हिंदी भाषेचा प्रसार करण्यासाठी असे उपक्रम राबविल्या जाणार आहे,अशी माहिती कुलगुरू रजनीश कुमार यांनी दिली.विद्यापीठाच्या गालिब सभागृहात हे कार्यक्रम होत असून समन्वयन कृष्ण कुमार व प्र – कुलगुरू हनुमानप्रसाद शुक्ल करतील.