बुलढाणा : राजूर घाटातील खडकी मार्गावरील देवीच्या चबुतऱ्याजवळ २४ वर्षीय युवकाने दसऱ्याच्या दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुनील रतन वाणी (२४), राहणार शांतीनगर, बुलढाणा) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. अपंग असणारा सुनील ५ ऑक्टोबर रोजी सकाळीच त्यायत टीव्हीएस स्कुटी (एमएच २८ एव्ही ४९८०) घेऊन घरातून बाहेर पडला होता, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्याने मलकापूर मार्गावरील राजूर घाटातील निर्मनुष्य असलेला खडकी परिसर गाठला. यानंतर छोटेखानी मंदिर परिसरातील पळसाच्या झाडाला दोरीचा गळफास लावून आत्महत्या केली. त्याची दुचाकी देखील त्याच परिसरात आढळून आली. घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार, नायक पोलीस गंगेश्वर पिंपळे, विनोद बोरे, चालक वाघ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 24 year old youth committed suicide on dussehra festival zws