लोकसत्ता टीम

गोंदिया: येत्या २८ व ३० एप्रिल रोजी गोंदिया जिल्ह्यातील सात कृषी उत्पन्न बाजार समितीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार २० एप्रिल हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता.

57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Vanchit Bahujan Aghadi, Bahujan Samaj Party,
आंबेडकरी पक्षांच्या उमेदवारांचा वेलू गगनावरी !
Supriya Sule comment on BJP, Supriya Sule,
१६३ अपक्ष उमेदवारांना ‘पिपाणी’ देऊन रडीचा डाव, खासदार सुप्रिया सुळे यांची भाजपवर टीका
Sri Lanka polls Ruling NPP secures two thirds majority
श्रीलंकेच्या संसदेत एनपीपीला बहुमत ; २२५ पैकी १५९ जागांवर विजय
confusion names voters Koparkhairane, Koparkhairane,
२५० मतदारांच्या नावांचा घोळ; कोपरखैरणेत नावे वगळणे, भलत्या मतदान केंद्रात नाव गेल्याचे प्रकार, तक्रार दाखल
west Vidarbha, number of women candidates, contesting election
रणरागिनी… पश्चिम विदर्भात गेल्‍या निवडणुकीपेक्षा दुप्‍पट महिला उमेदवार रिंगणात

दुपारी ३ वाजेनंतर सातही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रणांगणाचे चित्र स्पष्ट झाले आहे. देवरी वगळता ६ कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक चुरसीची होणार हे दिसून येत आहे. ७ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण १२६ संचालक पदाच्या जागांसाठी रिंगणात २४१ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. जिल्ह्यात मागील २० दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत.

हेही वाचा… मान्यता नसतांनाही शाळा चालविणाऱ्या संचालकास होणार एक लाखाचा दंड; शिक्षणाधिकाऱ्यांवरही कठोर कारवाईच्या सूचना

नामांकन अर्ज दाखल व छाणणी प्रक्रियेनंतर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. २० एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामांकन अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे सातही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रणसंग्रामाचे चित्रही स्पष्ट झाले आहे. देवरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रिंगणात संचालक पदाऐवढेच नामांकन अर्ज शिल्लक राहिल्यामुळे तेथील सर्व उमेदवारांची अविरोध निवड निश्चित झाली आहे.

हेही वाचा… नागपूर : मेडिकलमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांची खासगी सुरक्षा रक्षकाला मारहाण

तर इतर ६ ठिकाणी निवडणूक होण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रिंगणात एकूण ४४ उमेदवार आहेत तर अर्जुनी मोरगाव-३८, आमगाव-३९, सडक अर्जुनी-३१, गोरेगाव-३१, तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रिंगणात ४० उमेदवार भाग्य आजमावित आहेत.

आमगाव व तिरोडा येथील चुरसीची लढत

तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रिंगणात एकूण ८१ उमेदवारांचे नामांकन कायम होते. त्यातील ४१ उमेदवारांनी रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे ४० उमेदवार रिंगणात भाग्य आजमावित आहेत. त्याच प्रमाणे आमगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रिंगणात एकूण १०६ उमेदवारांचे नामांकन पात्र ठरले होते. त्यातील ६७ उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे ३९ उमेदवार रिंगणात भाग्य आजमावत आहेत.