वर्धा: ब्रम्हांडरुपी आकाशात २५एप्रिलला सर्वानाच एक वैशिष्ट्यपूर्ण आणि रोमांचक गोष्ट दिसणार आहेत. २५एप्रिल या दिवशी जगातील खगोल निरीक्षकांना आकाशात एक अदभूत आणि नेत्रदीपक असा अद्वितीय दुश्य सर्वांना प्रत्यक्ष अनुभवता येईल. या आगळ्यावेगळ्या दिवशी सर्वांना निळ्या आकाशाच्या गालावर हास्य दिसणार आहेत. कारण या दिवशी आकाशात ट्रिपल प्लँनेटरी कंजक्शन म्हणजे दोन विशाल ग्रह व एक उपग्रह या तिघांचा संयोग घडणार आहेत. त्यामुळे आकाशात एक हसणारा चेहरा दिसणार आहेत.
या दुर्मिळ ग्रह संयोगात शुक्र, शनि,आणि चंद्र एकत्र दिसणार आहेत. या तिघांच्या संयोगातून एक उमलते तेज हास्य चेहऱ्याचा आकार आकाशात निर्माण होईल. या नेत्रदीपक दुश्याचा आनंद जगभरातील कोणत्याही देशातील कोणत्याही ठिकाणावरून घेता येईल. हा ग्रह संयोग तेव्हा होतो,जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा अधिक अंतराळातील घपे एकमेकांच्या अतिशय जवळ असतात आणि त्यामुळे ते आपल्याला एकत्र दिसतात. जेव्हा तीन ग्रह एकत्र येतात, तेव्हा त्याला अवकाशीय भाषेत ट्रिपल प्लँनेटरी कंजक्शन म्हणतात.
२५एप्रिल२०२५शुक्रवार रोजी शनि,शुक्र आणि चंद्र या तीन अंतराळ पिंडाचा संयोग होणार आहेत. यामुळे एक वैशिष्ट्यपूर्ण आकृती आकाशात तयार होईल. अर्थातच जी हसणाऱ्या चेहऱ्याचे रुप धारण करेल.२५एप्रिल२०२५च्या सकाळी सुर्योदयापुर्वी शुक्र आणि शनी ग्रह एकमेकांच्या अतिशय जवळ दिसतील. तसेच शुक्र आणि शनि हे ग्रह मानवी चेहऱ्यावरील डोळ्याच्या रुपात भासतील आणि त्यांच्या खाली चंद्र हा अर्धचंद्र रूपात तोंडासारखे मुख म्हणून दिसून येणार आहेत. म्हणजेच या रचनेतुन एक हसणारा चेहरा तयार होईल.
या खास, आगळ्यावेगळ्या दुश्याचे निरीक्षण२५एप्रिल ला सकाळी पुर्वेकडील आकाशात सुर्योदयाच्या एक तासभर आधी हा विलोभनीय नजराणा दिसणार आहेत. या संयोगाचे निरीक्षण करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या आकाशीय,उपकरणांची अजिबात आवश्यकता राहणार नाहीत. तद्वतच शुक्र आणि शनी प्रखरपणे दिसतील. अधिक स्पष्ट पणे पाहण्यासाठी चांगली दुर्बीण किंवा बियनाँक्युलर उपयोगी पडू शकतो.
हा अवकाशीय नजराणा पाहण्यासाठी आपल्याला पुथ्वीच्या दिशेने स्पष्ट आकाश पाहणे आवश्यक आहेत. या संयोगाचे सर्वोत्तम दुश्य सुर्योदयापुर्वीच्या एका तासात आपल्याला मिळू शकते. तसेच जर आकाश निरभ्र असेल तर बुध,ग्रह देखील तिसऱ्या चमकणाऱ्या पिंडाच्या खाली दिसु शकतो. त्यामुळे अंतराळ क्षेत्राची विशेष आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांनीही हे विलोभनीय दुश्य पाहायला हवे, असे मला वाटतेअशी प्रतिक्रिया अंतराळ विषयाची आवड असणारे शिक्षक अविनाश ल. टाके देतात.आपल्या आकाशात अदभूत आणि नयनरम्य खगोलीय घटना घडत असतात. या वैशिष्ट्यपूर्ण, दुर्मिळ घटना बघण्यासाठी शाळेच्या, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी व्हिज्युअल तपशीलासाठी बाँयनाक्युलर किंवा दूरदर्शन दुर्बिणी वापरणे फायदेशीर ठरेल, असे मुख्याध्यापक उमेश आसटकर सांगतात.
आपल्या ब्रम्हांडामध्ये अनेक खगोलीय घटना नित्यक्रमाने घटत असतात, पर्यावरण, विज्ञान, खगोलशास्त्र, भूगर्भातील घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करणे, हे शिक्षकासोबतच,विद्यार्थ्यांचे आद्य कर्तव्य ठरते. त्यामुळे हा खगोलिय नजराणा सगळ्या घटकांनी आकाशात पाहण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे.आपल्या अवकाशात नानाविध खगोलिय घटना घडत असतात.त्या लाखो, करोडो वर्षापासून अव्याहतपणे चालू आहेत, त्यामुळे आकाशगंगेचा अभ्यास करण्यासाठी हा आकाशातील नजराणा सुज्ञ् खागोलप्रेमी व विद्यार्थ्यांनी पाहणे आवश्यक असल्याचे मत खगोलशास्त्र अभ्यासक प्रा. सुरेंद्र गोठाणे व्यक्त करतात.