लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : भारत जोडो यात्रेदरम्यान ८ नोव्हेंबर २०२२ रोजी राहुल गांधींसोबत पदयात्रा करताना नागपूरचे काँग्रेस कार्यकर्ते कृष्णकुमार पांडे यांचे निधन झाले होते. यावेळी राहूल गांधी यांनी पांडे कुटुंबीयांना सांत्वनपर भेटीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार राहुल गांधी यांनी गुरूवारी नागपुरात पांडे कुटुंबीयांची भेट घेत २५ लक्ष रुपयांची मदत म्हणून धनादेशही दिला.

काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त काँग्रेस नेते राहूल गांधी गुरूवारी नागपुरात आले होते. याप्रसंगी कृष्णकुमार पांडे कुटुंबाला सभास्थळी बोलावून घेण्यात आले होते. यावेळी राहुल गांधी पांडे कुटुंबीयांना व्यासपिठाच्या मागे बनवलेल्या ग्रीन रुममध्ये भेटले. काही निवडक नेत्यांच्या उपस्थितीत ही भेट झाली. याप्रसंगी राहूल गांधी यांनी गेले एक वर्ष ते सांत्वनासाठी का येऊ शकले नाही? याबाबत सांगितले. सोबत पांडे कुटुंबाच्या आर्थिक स्थितीची माहिती घेत एका वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे २५ लाखांचा धनादेश दिला.

आणखी वाचा-“काँग्रेसला संपवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, पण…”, अशोक चव्हाणांची सत्ताधाऱ्यांवर टीका

दरम्यान, भारत जोडो यात्रेदरम्यान ८ नोव्हेंबर २०२२ रोजी राहुल गांधींसोबत पदयात्रा करताना नागपूरचे काँग्रेस कार्यकर्ते कृष्णकुमार पांडे यांचा निधन झाले होते. तेंव्हा भारत जोडो यात्रेदरम्यान झालेल्या श्रद्धांजली सभेत राहुल गांधी यांनी पांडे कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी लवकरच नागपुरात येईन, असे म्हटले होते. तसेच काँग्रेस पक्षाने पांडे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा शब्दही दिला होता. त्यानुसार ही भेट झाली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 25 lakh cheque from rahul gandhi to krishna kumar pandey family mnb 82 mrj