नागपूर : नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त होत असतानाच आता नागपुरातील मेडिकल-मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतही २४ तासांत २५ मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

मेडिकल आणि मेयो या दोन्ही रुग्णालयांवर राज्यातील विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यातीलही अत्यवस्थ रुग्णांचा भार आहे. या रुग्णांसाठी मेडिकलला १ हजार ४०१ अधिकृत तर ट्रामा व अतिरिक्त मिळून एकूण सुमारे १,८०० खाटा आहेत. मेयो रुग्णालयात ८२२ खाटा आहेत. दोन्ही रुग्णालयांत रोज सुमारे दीड हजार रुग्ण दाखल होऊन उपचार घेतात. दरम्यान, मेडिकलमध्ये २ ऑक्टोबरला २४ तासांत तब्बल १६ आणि मेयो रुग्णालयात ९ रुग्णांचा मृत्यू नोंदवला गेला. हे रुग्ण वेगवेगळ्या वयोगटातील आहेत. मेडिकलला दगावलेल्या एकूण रुग्णांपैकी ८ रुग्ण हे खासगी रुग्णालयांतून अत्यवस्थ अवस्थेत या ठिकाणी आले होते. या रुग्णांना मेडिकलच्या डॉक्टरांनी अतिदक्षता विभागात हलवले. परंतु २४ तासांच्या आत त्यांचा मृत्यू झाला. मेयोतही हीच स्थिती होती. त्यामुळे खासगी रुग्णालये त्यांच्याकडचे मृत्यू कमी दाखवण्यासाठी शेवटच्या क्षणी त्यांना मेडिकल-मेयोत हलवत असल्याचे निरीक्षण येथील काही डॉक्टरांनी नाव न टाकण्याच्या अटीवर नोंदवले.

thane body found hanged week ago in Kalwa has finally been identified
कर्जाला कंटाळून मनपा अधिकाऱ्याची आत्महत्या 
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
tempo hit on Satara road, Woman died Satara road,
सातारा रस्त्यावर टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू, दाम्पत्य जखमी; अपघातानंतर टेम्पोचालक पसार
Suicide bombings in Pakistan
पाकिस्तानात आत्मघातकी बॉम्बस्फोट; २७ ठार, ६२ जखमी; बलुचिस्तान प्रांतातील रेल्वे स्थानक हादरले
A young man attempted suicide from the employees building in the Police Commissionerate area
पोलिस आयुक्तालय परिसरातील कर्मचाऱ्यांच्या इमारतीवरून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
sucide pod controversy
सुसाईड पॉडमध्ये महिलेचा रहस्यमयी मृत्यू? मृत्यूचे कारण आत्महत्या की हत्या? यावरून सुरू झालेला नवा वाद काय?

हेही वाचा – ताडोबातील वाघांचा करिष्मा पाहून सारेच अवाक; पर्यटकांनी रोखून धरला श्वास

औषध साठ्याची स्थिती चांगली

मेडिकल आणि मेयो या दोन्ही रुग्णालयांमध्ये काही औषध रुग्णांना बाहेरून आणायला लावले जात असल्या तरी राज्यातील इतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांच्या तुलनेत येथे औषधांचा तीन महिने पुरेल एवढा साठा आहे. सर्पदंशासाठी आवश्यक इंजेक्शनसह इतर काही औषधांचाही वर्षभर पुरेल एवढा साठा असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

हेही वाचा – भंडाऱ्यात भर वस्तीत देहविक्री व्यवसाय

“मेडिकल टर्शरी केअर रुग्णालय असल्याने येथे अत्यवस्थ रुग्णच येतात. खासगी रुग्णालयाकडून अनेकदा सूचना न देता रुग्ण पाठवले जातात. आम्ही सर्वांवर उपचार करतो. मेडिकलमध्ये २४ तासांत दगावलेल्या रुग्णांची संख्या जास्त दिसत असली तरी त्यात खासगी रुग्णालयातून अत्यवस्थ अवस्थेत आलेले रुग्ण जास्त आहेत.” – डॉ. शरद कुचेवार, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल.