काढणी झाल्यानंतर २५ टक्के संत्रावर्गीय फळे विक्रीस अयोग्य ठरतात. अयोग्य हाताळणी व सदोष प्रक्रियेमुळे फळांचे नुकसान होत असल्याचा निष्कर्ष डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत फळे संशोधन प्रकल्पाने काढला आहे. फळांची नासाडी टाळण्यासाठी फळ उत्पादकांसाठी उपाययोजना देखील सूचवण्यात आल्या आहेत.

हेही वाचा- गोंदिया : रस्ते खडीकरणाच्या श्रेयावरून आजी-माजी आमदारांमध्ये चढाओढ; एकाच कामाचे दोनदा भूमिपूजन

Thane Anti Corruption Bureau arrested senior clerk for demanding two percent to clear dues
लाचेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीक अटकेत
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात

बहराच्या फळ काढणीला सध्या सुरुवात झाली आहे. संत्रा, मोसंबी बागेतील फळांची काढणी योग्य वेळी व काळजीपूर्वक केल्यास मोठे नुकसान टाळता येणे शक्य आहे. त्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करणे देखील आवश्यक आहे. संत्रा फळांची काढणी व हाताळणी काळजीपूर्वक केल्यास फळांची नासाडी होण्याचे प्रमाण कमी होते. मात्र, बहुतांश फळ उत्पादक व कामगारांमध्ये शास्त्रोक्त माहितीचा अभाव दिसून येतो. काढणीनंतर संत्रा फळांची अयोग्य हाताळणी, पॅकिंग, सदोष वाहतूक, साठवणुकीच्या अपुऱ्या सोयी व काढणीनंतर फळांवरील प्रक्रियेच्या अभावामुळे सुमारे २५ टक्के फळे विक्रीस अयोग्य होतात, असे प्रकल्पातील संशोधकांनी सांगितले.

हेही वाचा- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ‘ती’ घोषणा, अन् जिल्ह्यात श्रेयवादाची लढाई

संत्रावर्गीय फळे केळी व आंब्यासारखी झाडावरून तोडल्यानंतर पिकत नसल्याने ती पिकेपर्यंत झाडावरच ठेवावी लागतात. परिपक्व होण्यापूर्वी तोडल्यास फळांत रस कमी भरतो. साखरेचे प्रमाण कमी राहून आंबटपणा राहतो. फळे तोडताना त्याला इजा होऊ देऊ नये, जमिनीवर पडलेल्या फळांची पॅकिंग करू नये, तशी फळे वाहतुकीदरम्यान लवकर सडतात. फळे अधिक काळ चांगल्या स्थितीत राहण्यासाठी फळांची तोडणी योग्य पद्धतीने करणे महत्त्वाचे आहे. प्रचलित पद्धतीत फळाला पीळ देऊन व ओढून फळे तोडली जातात. यामुळे देठाकडील भागाला इजा होऊन फळाला छिद्र पडते. त्यामुळे साठवणुकीमध्ये देठाकडील इजा झालेल्या सालीच्या भागात बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. फळांचा दर्जा व टिकाऊपणा यावर विपरीत परिणाम होतो. झाडावरून फळे काढताना ती ओढून न घेता देठासह कापावीत. फळांची तोडणी करताना दोन मिमी एवढा देठ ठेवणे योग्य असते, अशी माहिती संशोधकांनी दिली.

हेही वाचा- “एमआयएम ही भाजपाचीच ‘बी टीम’”; चंद्रकांत खैरेंचे बावनकुळेंना प्रत्युत्तर; म्हणाले, “सध्या मुस्लीम आणि वंचित..”

फळे उन्हात राहिल्यास फळांची साल करपून फळांचा दर्जा व टिकाऊपणावर विपरीत परिणाम होतो. फळे परिपक्क होताना गर्द हिरवा रंग जाऊन फिक्कट हिरवा अथवा फिक्कट नारिंगी रंग येतो. सुरवातीला घट्ट असलेली साल थोडी सैल होते. सालीवर चकाकी येऊन त्यावरील तैलग्रंथीचे ठिपके स्पष्ट दिसू लागतात. फळे झाडावर जास्त दिवस ठेवल्यास फळांची साल ढिली होते. त्यामुळे दूरच्या बाजारपेठेत पाठवायची असल्यास फळे कमी पिवळी असताना तोडावीत. एकत्र केलेली फळे हवेशीर ठेवावी, असा सल्ला संशोधकांनी दिला.

हेही वाचा- गोंदिया : कॉन्व्हेंट संचालकाच्या मुलाची विद्यार्थिनींना अमानुष मारहाण, पालकांचा संताप अनावर

पारंपरिक वाहतूक पद्धत नुकसानकारक

ट्रक किंवा बैलगाडीत गवत पसरवून त्यावर फळांचा ढीग करून वाहतूक केली जाते. या पद्धतीत वाहतूक स्वस्त पडली, तरी १५ ते २० टक्के फळांचे नुकसान होते. गवत जमिनीवर पसरवून त्यावर फळांचा ढीग किंवा पॅकिंगसाठी गवताचा वापर करू नये, असे देखील संशोधकांनी स्पष्ट केले.

Story img Loader