नागपूर : International Women’s Day 2024 घनदाट जंगल.. वारसा स्थळे.. संस्कृतीचे माहेरघर.. अशा सर्व वाटा त्यांनी बाईकवरुन पूर्ण केल्या. त्या बाईकवरचे हात मात्र महिलांचे होते. भारताच्या कानाकोपऱ्यातून एक-दोन नाही तर २५ महिला बायकर्सने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दोन ते आठ मार्च या कालावधीत ‘क्वीन्स ऑन द व्हील’ या मोहिमेअंतर्गत तब्बल १४४० किलोमीटरचा प्रवास केला.

सीएसी-ऑलराऊंडर्सच्‍यावतीने आंतरराष्‍ट्रीय महिला दिनानिमित्‍त ‘क्वीन्स ऑन द व्हील’ या मोहिमेअंतर्गत बायकर्स महिलांसाठी प्रवास आखण्यात आला. नागपूर शहरातील सहा महिला बायकर्ससह संपूर्ण भारतातून २५ महिला बायकर्स यात सहभागी झाल्या. ‘हार्ट ऑफ इंडिया’ म्‍हणजेच मध्य प्रदेशातील समृद्ध वारसा स्‍थळे, विविधरंगी संस्कृती आणि घनदाट जंगलांचा प्रवास त्यांनी केला.

government that gives Rs 1500 as ladaki bahin is not doing favour to women
‘लाडक्या बहिणींनो’ कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
japan ban wedding after 25 for women
‘या’ देशात महिलांना पंचविशीनंतर विवाहास मनाई, प्रस्तावावरून नागरिक संतप्त; कारण काय?
west Vidarbha, number of women candidates, contesting election
रणरागिनी… पश्चिम विदर्भात गेल्‍या निवडणुकीपेक्षा दुप्‍पट महिला उमेदवार रिंगणात
'Gir Mat Jaana': Viral MP Woman's Dance Fails To Impress Netizens funny video goes viral
गावच्या महिलेचा ट्रेंडिंग गाण्यावर तुफान डान्स; मारल्या अशा स्टेप की VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
mahavikas aghadi release manifesto
महिलांना तीन हजार, मोफत बसप्रवास ते प्रत्येकी ५०० रुपयांत सहा गॅस सिलिंडर; मविआच्या जाहिरनाम्यात घोषणांचा पाऊस!
Advice from Uttar Pradesh State Commission for Women to male tailors
‘पुरुष शिंप्यांनी महिलांचे माप घेऊ नये’ ; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाचा सल्ला

हेही वाचा…नागपूर : युवतीचे दोघांशी प्रेमसंबध, वादातून दुसऱ्या प्रियकराने प्रेयसीच्या पहिल्या प्रियकराचा केला खून

मध्‍य प्रदेश टुरिझमच्‍या सहकार्याने आयोजित करण्‍यात आलेल्‍या ‘क्वीन्स ऑन द व्हील’ या ट्रेलच्‍या माध्‍यमातून नागपूरसह, हैदराबाद, भुवनेश्वर, मुंबई, पुणे, उज्जैन, इंदूर, ग्वाल्हेर, देवास आदी ठिकाणाहून आलेल्‍या महिला बायकर्सने सांची, चंदेरी, कुनो, ग्वाल्हेर, ओरछा, खजुराहो आणि भोपाळ असा १४४० किलोमीटरचा प्रवास दोन ते आठ मार्च या कालावधीत पूर्ण केला. या मोहिमेदरम्‍यान त्यांनी गावांमधील महिला व मुलांशी संवाद साधला.

या महिला बायकर्स व्यावसायिक बायकर्स नाही तर कुणी शिक्षण घेणाऱ्या, कुणी आयआयटीतल्या अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या होत्या. पहिल्यांदाच त्या अशा मोठ्या मोहिमेत सहभागी झाल्या होत्या. एवढ्या मोठ्या संख्येने कदाचित पहिल्यांदाच महिला बायकर्स पाहून ठिकठिकाणी त्यांचे स्वागत केले जात होते. तर या संपूर्ण कालावधीत त्यांनीही आठ मार्चला भोपाळ येथे या मोहिमेचा समारोप झाला. महिला सक्षमीकरण आणि साहसी पर्यटनाला चालना देण्‍यासोबतच मध्यप्रदेशला महिला प्रवाशांसाठी सुरक्षित आणि सशक्त स्थान म्हणून प्रदर्शित करणे, हा या ट्रेलचा मुख्य उद्देश होता.

हेही वाचा…Video : चंद्रपूर जिल्ह्यात १५० ते २०० दुर्मिळ काळवीट, सुरक्षेचा मोठा प्रश्न

या मोहिमेचे संयोजन सीएसी-ऑलराऊंडर्सच्‍या एकता खंते यांनी केले. त्यांच्यासोबत नागपूरचे स्वप्नील कपूर, अमोल वडीखाये तर मनालीचे राहुल आनंद हे या मोहिमेचे प्रमुख मार्गदर्शक होते. अजय गायकवाड यांनी या चमूचे नेतृत्व केले, अशी माहिती सीएसी-ऑलराऊंडर्सचे संचालक अमोल खंते यांनी दिली.