नागपूर: आर्थिक कोंडीत सापडलेल्या एसटी महामंडळाची स्थिती हळूहळू रुळावर येत आहे. २०२४- २५ मध्ये एसटीच्या ताफ्यात २,५०० बसगाड्या वाढणार आहेत. २०२५- २६ मध्ये नवीन २,५०० बसेस घेण्याचे महामंडळाचे नियोजन असून तसा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आला आहे.

प्रथम करोना व त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या बेमुदत संपामुळे एसटीची आर्थिक स्थिती पूर्णपणे कोलमडली होती. त्यामुळे महामंडळाकडून नवीन बस खरेदीही थांबली होती. दरम्यान आर्थिक कोंडीमुळे महामंडळाला जुन्या बसगाड्याही चालवणे कठीन झाले होते. दरम्यान शासनाने वेळोवेळी महामंडळाला केलेल्या आर्थिक मदतीमुळे कशातरी बसेस रस्त्यावर प्रवासी सेवा देत होत्या. दरम्यान या सर्व कोंडीमुळे एसटीच्या बसेसची संख्या राज्यात मोठ्या प्रमाणावर घटली होती.

TC Ashish Pande Suspended
Ashish Pande : “मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही”, म्हणणाऱ्या टीसी आशिष पांडेचं रेल्वेने केलं निलंबन
What is beef tallow and how is it made_
Tirupati laddoo: तिरुपतीच्या लाडवाच्या निमित्ताने चर्चेत आलेले बीफ…
Ashok Chakra, broom, Nagpur, Nitin Raut,
अशोक चक्रावर झाडूच्या चित्रावरून वाद, कॉंग्रेस नेते नितीन राऊत म्हणाले…
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Balasaheb Thorat
Balasaheb Thorat : महाविकास आघाडीत मतभेद? मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान; म्हणाले, “काँग्रेसचा…”

हेही वाचा – एकच व्यक्ती, एकच वेळी शाळेत मुख्याध्यापक अन् बॅंकेत लिपिकही!

दरम्यान, शासनाने एसटीत महिला व ज्येष्ठ नागरिकांना विविध सवलत जाहीर केल्या. या सवलतींच्या अंमलबजावणीमुळे राज्यभरात एसटी बसेसमध्ये प्रवासी संख्या वाढली. परंतु, एसटीमध्ये बसगाड्यांची संख्या कमीच होती. त्यामुळे महामंडळाने यापूर्वीच त्यांच्या स्तरावर शासनाच्या निधीतून २ हजार २०० बसगाड्या घेण्यास सुरुवात केली. त्यापैकी ५० बसगाड्या पुढच्या आठवड्यात मिळणार असून नोव्हेंबरमध्ये ३०० व त्यानंतर टप्या- टप्याने सर्व बसगाड्या मिळणार आहेत. आता एसटीने १ हजार कोटीतून २०२४- २५ मध्ये आणखी नवीन २ हजार ५०० बसेस घेण्याचे नियोजन केले आहे. तसा प्रस्तावही शासनाला दिला आहे. मंजुरी मिळताच निविदा प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी सांगितले.

“एसटी महामंडळाने यंदा २,२०० बसगाड्या खरेदीचे नियोजन केले असून टप्या- टप्याने या बसगाड्या मिळतील. २०२५ मध्येही सुमारे अडीच हजार बसेस घेण्याचे नियोजन असून तसा प्रस्ताव शासनाला दिला आहे. ” – डॉ. माधव कुसेकर, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ, मुंबई.

हेही वाचा – अशोक चक्रावर झाडूच्या चित्रावरून वाद, कॉंग्रेस नेते नितीन राऊत म्हणाले…

एसटी महामंडळाबाबत..

एसटी महामंडळाकडून प्रवासी वाहतुकीसाठी राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या व महत्वाच्या ठिकाणी २४७ आगारे व ५७८ बसस्थानकांमार्फत वाहतूक सेवा दिली जाते. प्रवासी सेवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी महामंडळाने अभिनव योजना अंमलात आणल्या असून प्रामुख्याने बसेसच्या रचनेत व रंगसंगातील बदल करण्यात आलेला आहे. २ बाय २ आसन व्यवस्थेसह परिवर्तन बसेस, अधिक आरामदायी आसनव्यवस्थेसह निमआराम बसेस महामंडळाने पुरविलेल्या आहेत. सोबत आणखी नवीन इलेक्ट्रिकसह इतरही बसेस उपलब्ध केली जात असल्याचे एसटी महामंडळाच्या संकेतस्थळावर नमूद आहे.