काल मंगळवारी ‘त्याने’ मित्र मंडळींशी दिवसभर गप्पा मारल्या. त्यांना पुढील अनर्थाची काहीएक चाहूल न येऊ देता संध्याकाळी त्यांचा निरोप घेत घर गाठले. आज, बुधवारी उत्तररात्री आपल्या मोबाईल वर वरीलप्रमाणे’ स्टेटस’ ठेवत ‘त्याने’ एका मंदिरात जाऊन आत्महत्या केली. देऊळगाव राजा तालुक्यातील सामाजिक व राजकीयदृष्ट्या संवेदनशील देऊळगाव मही येथे खळबळ उडवून देणारा हा घटनाक्रम आहे. गजानन गुरव (वय २६) असे टोकाचे पाऊल उचलणाऱ्या या युवकाचे नाव.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> बुलढाणा : फासेपारधी बांधवांचे जिल्हा कचेरी समोर धरणे आंदोलन सुरू

काँग्रेसच्या अल्पसंख्याक आघाडीचा देऊळगाव मही शहराध्यक्ष असणाऱ्या गजाननचा गोतावळा मोठाच. सामाजिक, राजकीय क्षेत्रात वावर व स्वभाव प्रेमळ, संवेदनशील असल्याने पंचक्रोशीत त्याचा चाहता वर्ग होता. १४ मार्च रोजी दिवसभर आपल्या मित्र परिवारासोबत  मनमोकळ्या गप्पा केल्या.

मध्यरात्री नंतर एकच्या आसपास तो घरातून बाहेर पडल्याचा कयास आहे. आपल्या मरणाचे ‘स्टेटस’ ठेवत आज उत्तररात्री दोन वाजताच्या सुमारास त्याने देऊळगाव येथील खंडोबा मंदिर गाठले. यानंतर गळफास घेऊन  जीवन संपविले. पहाटे घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली आणि घटनास्थळी पाहणाऱ्यांची मोठी गर्दी जमली होती. याप्रकरणी सुरेश रामदास गुरव यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. तपास पोलीस निरीक्षक जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत शिंदे करीत आहे. पोलीस चौकीचे शरद साळवे, निलेश मोरे आदींनी पंचनामा केला.