नववर्षात पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये डेंग्यूचे २८ रुग्ण नोंदवले गेले आहेत. त्यातील ३२ टक्के रुग्ण हे नागपूरच्या शहरी भागातील असल्याची नोंद पुणे येथील आरोग्य विभागाने केली आहे.
हेही वाचा- नागपूर : मतिमंद तरुणीचे अपहरण करुन बलात्कार; ऑटोचालकाला अटक
आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२३ दरम्यान पूर्व विदर्भातील सर्वाधिक १२ डेंग्यूचे रुग्ण गोंदियात आढळले. नागपूर शहरात ९, नागपूर ग्रामीणला १, चंद्रपूर ग्रामीणला २, चंद्रपूर शहरात २, गडचिरोलीत २ रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्णांपैकी गेल्या सात दिवसांमध्ये ३ रुग्ण आढळले असून त्यापैकी १ रुग्ण नागपूर शहर व २ रुग्ण गोंदिया जिल्ह्यातील आहेत. एकूण रुग्णांमध्ये गोंदियात सर्वाधिक डेंग्यूग्रस्त आढळत असल्याने तेथे हा आजार आणखी वाढण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. तर सार्वजनिक आरोग्य विभागाकडून रुग्ण आढळलेल्या भागात तातडीने कीटकनाशक फवारणीसह इतर उपाय सुरू केल्याचा दावा करण्यात आला असून आता स्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा- लोकजागर: गोरेवाड्याचे ‘गौडबंगाल’!
डेंग्यूची स्थिती (१ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२३)
जिल्हा रुग्ण
नागपूर (श) ०९
नागपूर (ग्रा.) ०१
वर्धा ००
भंडारा ००
गोंदिया १२
चंद्रपूर (ग्रा.) ०२
चंद्रपूर (श) ०२
गडचिरोली ०२
एकूण २८