चंद्रपूर: एचआयव्ही बाधित असलेल्या गर्भवती माता सृदढ व निरोगी बाळाला अर्ली इफेट डायग्नोसिस कार्यक्रमाअंतर्गत जन्म देत आहे. २०२२ ते २३ या कालावधीत तब्बल २८ एचआयव्हीग्रस्त मातांनी निरोगी व एचआयव्हीमुक्त बाळाला जन्म दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गरोदर माता एचआयव्ही संसर्गित असेल तर त्या मातांना शासकीय रुग्णालयात मोफत उपचार दिला जातो. त्यामुळे बाळाला होणारा एचआयव्हीचा संसर्ग टाळण्यास मोठी मदत मिळते. एचआयव्हीग्रस्त गर्भवती महिलांसाठी अर्ली इफेट डायग्नोसिस कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. गर्भवती महिलांना या योजनेअंतर्गत विशेष उपचार देवून देखरेखीखाली ठेवण्यात येते. सन २०२२ ते २०२३ मध्ये तब्बल एचआयव्हीग्रस्त २८ मातांनी एचआयव्हीमुक्त बाळाला जन्म दिला आहे. विशेष म्हणजे, सहा आठवडे, सहा महिने, बारा महिने, १८ महिने अशा चारवेळा या बालकांची अर्ली इफेट डायग्नोसिस कार्यक्रमाअंतर्गत तपासणी केली असता, ही २८ बालकेही एचआयव्हीमुक्त आढळून आली आहेत. त्यामुळे एचआयव्ही बाधित गरोदर महिलाही निरोगी बाळाला जन्म देत आहेत. सन २०२२-२०२३ या कालावधीत जन्मलेल्या २८ बाळांची अर्ली इफेट डायग्नोसिस प्रोग्रामअंतर्गत १८ महिन्यांपर्यंत चारवेळा तपासणी केल्यानंतर ते निगेटिव्ह आढळून आले आहेत. वेळेत व नियमित उपचार घेतल्याने हे शक्य झाल्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार यांनी सांगितले.

हेही वाचा – ‘पती, पत्नी और वो…’ प्रेमाच्या त्रिकोणातून दोन संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर; भरोसा सेलने…

३९ हजार १०२ गर्भवतींची एचआयव्ही तपासणी

एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत जिल्ह्यात ३९ हजार १०२ गर्भवतींची एचआयव्ही तापसणी करण्यात आली. या कालावधीत झालेल्या तपासणीमध्ये २८ मातांचा अहवाल एचआयव्ही सकारात्मक आढळून आला.

हेही वाचा – जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचा नवा निर्धार, नागपूर ते मुंबई संकल्प यात्रेला सुरुवात

…तरच बाळ एचआयव्हीमुक्त

बाळांची सहा आठवडे, सहा महिने, बारा महिने, १८ महिने अशा चारवेळा तपासणी करण्यात येते. या चारही तपासण्यांमध्ये बाळ एचआयव्ही नकारात्मक आढळून आला तोच बाळ एचआयव्हीमुक्त म्हणून संबोधल्या जाते. २०२२-२०२३ या कालावधीत २८ बाळ एचआयव्हीमुक्त झाले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 28 healthy and hiv free babies born to hiv infected mothers rsj 74 ssb
Show comments