नागपूर: अनेक शैक्षणिक अभ्यासक्रमात डेटा सायन्सचा समावेश करण्यात येत आहे. तसेच, डेटाशी संबंधित नव्या उद्योगांमध्ये तरुणांच्या हातांना काम मिळत आहे. या क्षेत्राची सध्या होणारी एकूण वाढ पाहता येत्या पाच वर्षात डेटाशी संबंधित शिक्षण क्षेत्रात तब्बल ३ लाख ३० हजार नवे रोजगार निर्माण होणार आहेत, असा अंदाज या क्षेत्राशी संबंधित संस्थांनी वर्तवला आहे. आधुनिक विज्ञान संगणक क्रांती, माहिती तंत्रज्ञान, मोबाइल इंटरनेट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यामुळे सध्याचे चित्र पुरते पालटून गेले आहे. घराघरात डेटा हा घटक अत्यंत महत्त्वाचा ठरतो आहे.

डाटा सायन्समध्ये नाविन्यता आणि कल्पकतेला असलेला वाव आणि देशात तसेच परदेशात असलेल्या अनेक संधी यामुळे तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणावर या क्षेत्राकडे वळताना दिसत आहेत. पालकही या पर्यायांविषयी अधिक माहिती घेताना दिसत आहेत. नावीन्यता आणि कल्पकतेला वाव देणारे डेटा विज्ञान जगभरातील इतर देशांप्रमाणे भारतातील तरुणवर्गात खूप लोकप्रिय आहे.

57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Preventive action, maharashtra vidhan sabha elections 2024, Preventive action five districts maharashtra,
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाच जिल्ह्यांतील ३४ हजार सराइतांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई
Extension of the Sadanika Lottery Scheme of PMRDA Pune news
पीएमआरडीएच्या सदनिका लाॅटरी योजनेला मुदतवाढ
Recruitment in town planning department
नोकरीची संधी : नगररचना विभागात भरती
all 1676 polling stations in Nashik and Malegaon have CCTV and live webcast
नाशिक, मालेगावातील १६७६ मतदान केंद्रांवरील घडामोडींचे थेट प्रक्षेपण
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?

हेही वाचा… उपराजधानीत पुन्हा खूनसत्र! चोवीस तासांत दोन हत्याकांड

या क्षेत्रात चांगली स्पर्धा पहायला मिळते. त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक वेगाने वाढत आहे. असे शिक्षण देणारी अनेक केंद्र देशात आकार घेत आहेत. या क्षेत्रात होणारी एकूण गुंतवणूक आणि वाढता पसारा पाहता येत्या पाच वर्षात नवे रोजगार निर्माण वेग ५७ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पाच वर्षांत तब्बल ३ लाख ३० हजार तरुणांच्या नोकऱ्या मिळण्याचा अंदाज आहे.