भंडारा : वीज बिल भरण्याच्या नावाखाली भंडारा येथील एका न्यायाधीशांना एका भामट्याने तीन लाख रुपयाने ऑनलाईन फसवल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायाधीश चारुदत्त लक्ष्मीकांत देशपांडे यांच्या मोबाईलवर एक संदेश आला. त्यात वीज बिल थकीत असून तत्काळ न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्यात येईल असे म्हटले. यावरून न्या. देशपांडे यांनी संबंधित नंबरवर फोन केला. तेव्हा ‘क्विक सपोर्ट’ हे ‘ॲप इन्स्टॉल’ करण्यास सांगून त्यावर आलेली ‘लिंक’ शेअर करून ११ रुपये पाठवण्यास सांगितले.

हेही वाचा >>> वाशीम: परिवहन विभागाकडून ५९ खासगी बसेसवर कारवाई, केवळ १० टक्के अधिक भाडे आकारण्यास मुभा

हेही वाचा >>> विदर्भ साहित्‍य संघाच्‍या अध्‍यक्षपदी प्रदीप दाते 

न्या. देशपांडे यांनी ११ रुपये ‘नेट बँकिंग’द्वारे जमा केले असता त्यांच्या स्टेट बँकेच्या खात्यातून पहिल्यांदा ९९ हजार ९९० रुपये, दुसऱ्यांदा पुन्हा तेवढेच आणि तिसऱ्यांदा ९९ हजार ९९८ रुपये असे एकूण २ लाख ९९ हजार ९७८ रुपये एका ‘क्रेडिट कार्ड’द्वारे ‘ट्रान्सफर’ झाल्याचे लक्षात आले. हा प्रकार लक्षात येताच न्या. देशपांडे यांनी भंडारा ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला.

Story img Loader