गोंदिया : गोंदियातील एका खासगी शिकवणी वर्गात शिक्षक असलेले तीन शिक्षक तमांगता धरण येथे १५ ऑगस्ट रोजी सहलीसाठी गेले होते. यातील चौघांपैकी तिघांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना १५ ऑगस्टला सायंकाळच्या सुमारास घडली.

एन. मिश्रा रा. भिलाई, अरविंद सर रा. उत्तर प्रदेश आणि अतुल कडू रा. नागपूर असे या घटनेतील मृतकांची नावे आहेत. गोंदियातील सिद्धिविनायक शिकवणी वर्गात शिकवत असताना गोंदियात वास्तव्याला असलेले सदर शिक्षक मूळचे यातील एक शिक्षक नागपूर, एक भिलाई आणि एक उत्तर प्रदेश येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Two youths died after drowning in a tank in Bhalivali vasai news
भालिवली येथील कुंडात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
thane body found hanged week ago in Kalwa has finally been identified
दवाखान्यातील चिठ्ठीमुळे कुजलेल्या मृतदेहाची ओळख पटली, आठवड्याभरापूर्वी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता मृतदेह
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
passenger two-wheeler died, dumper hit Bopodi,
डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडीत अपघात

हेही वाचा – वीट भट्टीवर जन्मलेल्या बांबू कलावंतांचा संघर्ष सिनेमात

या बुडालेल्या तिघांचे मृतदेह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकाने धरणाच्या बाहेर काढून राजनांदगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यांच्या मृतदेहावर आज राजनांदगाव जिला रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर त्यांचे मृतदेह त्यांच्या मूळ गावी पाठविले जाणार आहे.

हेही वाचा – पावसाच्या विश्रांतीचा सोयाबीनला अधिक फटका, १८ ऑगस्टपासून पावसाची शक्यता

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि १६ ऑगस्ट पतेती या सणानिमित्त लागोपाठ दोन दिवस सुट्टीचे आल्याने गोंदियातील सिद्धिविनायक शिकवणी वर्गाचे तीन शिक्षक भिलाईतील शिक्षक मित्राच्या आमंत्रणावर राजनांदगाव येथील मांगता धरणावर सहलीसाठी गेलेले होते. राजनांदगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतकांमध्ये एन. मिश्रा रा. भिलाई, अरविंद सर रा. उत्तर प्रदेश आणि अतुल कडू रा. नागपूर यांचा मृत्यू झाला आहे.