नागपूर : महामेट्रोने तिकीट दरात वाढ केल्यावर प्रवासी संख्या कमी झाल्याचे दिसून येताच विविध योजनांची घोषणा करणे सुरू केले आहे. विद्यार्थ्यांना सवलत देण्यासह अलीकडेच ‘डेली पास’ची घोषणा केली होती. आता शनिवार-रविवार या सुटीच्या दिवसात नागपूरकरांनी मेट्रोतून प्रवास करावा म्हणून `वीकेंड डिस्काउंट’ योजना जाहीर केली असून या दोन दिवशी प्रवाशांना तिकीट दरात ३० टक्के सवलत देण्यात येणार आहे.
हेही वाचा >>> ‘महंगा सिलेंडर महंगा तेल, मोदीजी आप सरकार चालाने मे हो गये फेल’ , गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस रस्त्यावर
नवीन धोरणानुसार, तिकिटां व्यतिरिक्त प्रवासासाठी महाकार्ड वापरणारे प्रवासीही या सवलतीसाठी पात्र असतील. महामेट्रो सर्व श्रेणीतील विद्यार्थ्यांना ३० टक्के सवलत देते. याशिवाय नागपूर मेट्रोने अलीकडेच प्रवाशांसाठी डेली पासची सुविधा सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, एक प्रवाशी १०० रुपयांमध्ये डेली पास खरेदी करून एक दिवस मेट्रोतून कितीही वेळा प्रवास करू शकतो.
हेही वाचा >>> ‘राजश्री शाहू’चा रक्तदान शिबीर पंधरवडा , राज्यात ७५ ठिकाणी आयोजन, एक हजार बाटल्या संकलनाचे उद्दिष्ट
‘विकेंड डिस्काउंट ’ही संकल्पना ही शनिवार-रविवार या दोन सुटीच्या दिवसात विविध खासगी कामांसाठी किंवा खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना डोळ्यापुढे ठेवून तयार करण्यात आली आहे. यामुळे कमी किमतीत प्रवास करता येणे शक्य होणार आहे. मट्रो वातानुकूलित असल्याने प्रवाशांची सोय होणार असल्याचा दावा महामेट्रोने केला आहे.