चंद्रपूर : रंगांचा सण ‘होळी’ला अवघे काही दिवस उरले आहेत. होळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील दुकानदारांनी आपापली दुकाने साहित्याने भरली आहेत. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा रंग, पिचकारी, गुलाल आदींच्या किमती २० ते ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे बाजारामध्ये खरेदीदारांचा निरुत्साह दिसून येत आहे.

चंद्रपूर शहरातील गोल बाजारातील पिचकारी, रंग, गुलाल घाऊक विक्रेत्यांची दुकाने सजली आहेत. येथे होळीचे साहित्य नागपूर व दिल्लीतून येते. यंदाच्या उत्सवात चांगला व्यवसाय होईल या आशेने छोट्या व्यावसायिकांनी होळीचे सर्व सामान दुकानात भरले. मात्र, बाजारात खरेदीदारांमध्ये उत्साह दिसून आला नाही. माईक बूमप्रमाणे दिसणारी खास पिचकारी बाजारात दाखल झाली आहे. यावर्षी पहिल्यांदाच ही पिचकारी दाखल झाल्याने या पिचकारीला मोठी मागणी आहे. याशिवाय पिचकरीचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. लहानांपासून मोठ्यांना भुरळ घालतील अशा अनेक प्रकारच्या पिचकारी उपलब्ध आहेत. पिचकारीची किंमत २५ ते ५५० रुपयांपर्यंत आहे. होळीला आठवडा उरला असल्याने व्यवसायात सुधारणा होईल, असा विश्वास विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे. लहान मुले आणि प्रौढांसाठी पिचकरीचे विविध प्रकार उपलब्ध असून त्यात बूम, बंदुकीसारखी पिचकारी, सेंच्युरी कलर थ्रोअर, रंगांपासून बचाव करणारे मुखवटे, टीव्ही रिपोर्टर्सनी वापरलेली टोपी, आदी विशेष आकर्षण आहे.

Thane Anti Corruption Bureau arrested senior clerk for demanding two percent to clear dues
लाचेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीक अटकेत
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
rupee continues to depreciate, US dollar, rupee ,
रुपयाचे मूल्य आणखी खोलात!
Income Tax , salary , Finance Minister,
पगारदारांच्या ‘इन्कम टॅक्स’मध्ये कपात? क्रयशक्तीत वाढीसाठी अर्थमंत्र्यांकडून उपाय शक्य
red sanders smuggling
Pushpa Box Office Collection : चंदन तस्करीवर बेतलेल्या ‘पुष्पा’नं कमवले १५०० कोटी; पण खऱ्याखुऱ्या रक्तचंदनाला मात्र ग्राहकच नाही

हेही वाचा – महानिर्मितीमध्ये चौकशी थांबवण्यासाठी कामगार संघटनेच्याच बनावट पत्राचा वापर; अभियंत्यासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल

हर्बल गुलालही बाजारात

बाजारात लाल, हिरवा, निळा, पिवळा गुलाल नेहमीच विकला जातो. यावेळी बाजारात नवीन रंगीत गुलाल उपलब्ध आहेत. जांभळे, केशरी, धानी आदी रंगीत गुलालही आले आहेत. आता ग्राहक नवीन रंगाच्या गुलालाची मागणी करत असल्याचे विक्रेते सांगतात. त्यांची मागणी लक्षात घेऊन नवीन रंगीत गुलाल मागविण्यात आला आहे. त्वचेला हानिकारक गुलाल अनेकजण टाळत आहेत. अशा लोकांसाठी हर्बल गुलालही बाजारात उपलब्ध आहे.

हेही वाचा – राजकीय धमाका : “लोकसभा निवडणुकीत स्थानिक उमेदवार द्या, अन्यथा…” वर्ध्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांचा इशारा

महागाईमुळे गोड गाठी झाली कडू!

महाराष्ट्रात होळीचा रंग, गुलालाची उधळण केल्यावर लहान मुलांना साखरेपासून बनवलेली ‘गाठी’ देण्याची प्रथा आहे. विशेषत: होळीच्या दिवशी हे अधिक महत्त्वाचे असते. त्यामुळे गोलबाजारातील अनेक दुकानांमध्ये खरेदीदारांचे लक्ष वेधून घेणाऱ्या ‘गाठ्या’ उपलब्ध आहेत. मात्र, या गोड गाठ्यांवरही महागाईचा प्रभाव दिसून येत आहे.

Story img Loader