नागपूर : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने दसरा, दिवाळी, छठसाठी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०२१३९ सुपरफास्ट स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १९ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर दरम्यान सोमवार आणि गुरुवारी रात्री १२.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३.३०० वाजता नागपूर येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०२१४० सुपरफास्ट स्पेशल २१ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत मंगळवार आणि शनिवारी दुपारी दीड वाजता नागपूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.१० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गाडी क्रमांक ०२१४४ सुपरफास्ट स्पेशल १९ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक गुरुवारी सायंकाळी ७.४० वाजता नागपूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.२५ वाजता पुणे येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०२१४३ सुपरफास्ट स्पेशल २० ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबरपर्यंत दर शुक्रवारी पुणे येथून दुपारी ४.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता नागपूर येथे पोहोचेल.