नागपूर : बालविवाह प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी सरकारने बाल विवाह प्रतिबंधक कायदा लागू केला आहे. त्याची कठोर अंमलबजावणी सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी देशभरात गेल्या पाच वर्षांत (२०१७-२०२१) तब्बल ३ हजार २५४ बालविवाहांची नोंद झाली आहे. यात महाराष्ट्रातील १८५ प्रकरणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी प्रकरणांची संख्या ही वाढती चालली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंध्रप्रदेश, आसाम, बिहार, झारखंड, राजस्थान, तेलंगणा, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये बालविवाहाचे प्रमाण देशाच्या सरासरीपेक्षा अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. २००६ मध्ये बालविवाह प्रतिबंधक कायदा आणण्यात आला. त्यानंतर बालविवाहांच्या प्रकरणांत २०१९-२१ या दोन वर्षांत ४७ टक्क्यांहून २३ टक्क्यांपर्यंत घट झाल्याचा दावा केंद्र सरकारने केला. मात्र, पाच वर्षांतील आकडेवारी बघितली असता प्रकरणांच्या संख्येत वाढ झाल्याचेच दिसून येते. बालविवाह रोखण्यासाठी करण्यात येणारी जनजागृती व कठोर कायदे यामुळे आता लोक या विरोधात तक्रारी करण्यास पुढे येत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3254 cases in the country 185 cases in the state in five years despite measures to prevent child marriage amy
Show comments