गडचिरोली: नक्षल्यांशी मुकाबला करताना उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या ३३ गडचिरोली पोलीस जवानांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला राष्ट्रपती कार्यालयाकडून देशभरात एकूण २२९ शौर्य पदक घोषित करण्यात आले. त्यात गडचिरोलीतील ३३ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरवर्षी प्रजासत्ताक व स्वातंत्र्यदिनी उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व जवानांना राष्ट्रपती शौर्य पदक देऊन सन्मानित करण्यात येते. यंदा प्रजासत्ताकदिनी गडचिरोली पोलीस दलातील २९ जणांना शौर्य पदक देण्यात आले होते. आता स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ३३ पोलीस जवानांना राष्ट्रपती पदकाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे यावर्षी गडचिरोली पोलीस दलातील एकूण ६२ अधिकारी व अमलदारांना राष्ट्रपती शौर्य पदक प्राप्त झाले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गडचिरोली पोलीस नक्षल्यांशी मुकाबला करतात. त्यामुळे गडचिरोली पोलीस जवानांना शौर्य पदक मिळणे गौरवास्पद असल्याचे उद्गार पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी काढले आहे.

पदक प्राप्त पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची यादी

रोहित फारणे (सहाय्यक पोलीस निरीक्षक), भास्कर कांबळे (सहाय्यक पोलीस निरीक्षक), कृष्णा काटे (सहाय्यक पोलीस निरीक्षक), बाळासाहेब जाधव (पोलीस उपनिरीक्षक), सतीश पाटील (पोलीस उपनिरीक्षक), सुरपत वड्डे , मसरु कोरेटी, दृगसाय नरोटे, संजय वाचामी, गौतम कांबळे, मोरेश्वर पुराम, मुकेश उसेंडी, विनोद डोकरमारे, कमलाकर घोडाम, देविदास हलामी, महारु कुळमेथे, चंद्रकांत ऊईके, पोनाअ आत्राम, किरण हिचामी, दयाराम वाळवे, प्रवीण झोडे, दीपक मडावी, रामलाल कोरेटी, हेमंत कोडाप, वारलू आत्राम, माधव तिम्मा, नरेश सिडाम, रोहिदास कुसनाके,नितेश दाणे, कैलास कुळमेथे, प्रशांत बिटपल्लीवार, मुकुंद राठोड, नागेश पाल यांचा समावेश आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 33 jawans of gadchiroli police force awarded presidents police bravery medal ssp 89 dvr
Show comments