अमरावती : मध्‍य रेल्‍वेच्‍या भुसावळ विभागाने विविध तांत्रिक कामांसाठी येत्‍या १४ आणि १५ ऑगस्‍टला मेगा ब्‍लॉक घेतला असून भुसावळ विभागातून धावणाऱ्या अप-डाऊन मार्गावरील ३३ रेल्वे गाड्या रद्द करण्‍यात आल्‍या आहेत, तर १९ गाड्यांच्‍या मार्गात बदल करण्‍यात आला आहे. दरम्यान, दुसरा शनिवार, रविवार, सोमवारची एक दिवसाची सुटी टाकून मंगळवार व बुधवारपर्यंत असे ५ दिवस सुटी आली आहे. मात्र, रेल्वे गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांचे नियोजन कोलमडले आहे.

जळगाव ते मनमाड रेल्‍वे स्‍थानकादरम्‍यान तिसरी लाईन आणि यार्ड रिमॉडेलिंगच्‍या कामासाठी हा मेगा ब्‍लॉक घेण्‍यात आल्‍याचे रेल्‍वे प्रशासनातर्फे सांगण्‍यात आले आहे. रद्द झालेल्‍या गाड्यांमध्‍ये विदर्भातून जाणाऱ्या काही रेल्‍वे गाड्यांचा समावेश आहे. नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्‍स्‍प्रेस १३ आणि १४ ऑगस्‍टला रद्द करण्‍यात आली आहे. नागपूर-पुणे एक्‍स्‍प्रेस १३ ऑगस्‍टला धावणार नाही.

local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Follow up of demands to candidates through manifesto from Rickshaw Panchayat before elections
रिक्षाचालकांच्या मागण्या ऐरणीवर! निवडणुकीच्या तोंडावर रिक्षा पंचायतीकडून जाहीरनाम्याद्वारे उमेदवारांकडे पाठपुरावा
Reliance-Disney merger completed, Reliance-Disney,
रिलायन्स-डिस्ने यांचे ७०,३५२ कोटींचे महाविलीनीकरण पूर्ण
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
flying squads, Thane district code of conduct , assembly election
ठाणे : आचार संहितेच्या काळात २३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त; लाखो लिटर दारू; ६ कोटींचे मोफत वाटप साहित्य; १ कोटींचे अंमली पदार्थ
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड

हेही वाचा – आनंदवार्ता! पदभरतीचे परीक्षा शुल्क कमी होण्याचे संकेत, अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

डाउनच्या पुढीलप्रमाणे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत:

देवळाली-भुसावळ एक्स्प्रेस, मुंबई- साईनगर शिर्डी वंदे भारत एक्‍स्‍प्रेस (दि. १४), मुंबई-नांदेड एक्स्प्रेस, इगतपुरी-भुसावळ एक्स्प्रेस, मुंबई-जालना एक्स्प्रेस, पुणे-जबलपूर एक्स्प्रेस (दि. १४), दादर बलिया एक्स्प्रेस (दि. १२), मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, मुंबई-आदिलाबाद एक्स्प्रेस (दि. १३/१४), पुणे-नागपूर एक्स्प्रेस (दि. १४), रिवा एक्स्प्रेस (दि. १५), पुणे-नागपूर एक्स्प्रेस (दि. १५), नांदेड एक्स्प्रेस, सिकंदराबाद एक्स्प्रेस, कोल्हापूर गोंदिया ट्रेन, लोकमान्य टिळक टर्मिनल-नांदेड एक्स्प्रेस.

हेही वाचा – नवेगाव-नागझिरालागत राज्य महामार्गावर वाघाचा मृत्यू

अपच्या रद्द करण्यात आलेल्या गाड्या अशा :

भुसावळ-देवळाली एक्स्प्रेस (दि. १३/१४), साईनगर शिर्डी -मुंबई वंदे भारत एक्‍स्‍प्रेस (दि. १४), नांदेड-मुंबई एक्स्प्रेस (दि. १३/१४), भुसावळ-इगतपुरी (दि. १४), जालना-मुंबई एक्स्प्रेस, जबलपूर-पुणे एक्स्प्रेस (दि. १४), बलिया-दादर एक्स्प्रेस (दि. १३/१६), नागपूर- मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस (दि. १३/१४), आदिलाबाद-मुंबई एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेस (दि. १३), पनवेल एक्स्प्रेस (दि. १४), नागपूर-पुणे एक्स्प्रेस (दि. १४), मुंबई-नांदेड एक्स्प्रेस, सिकंदराबाद-मुंबई एक्स्प्रेस (दि. १३/१४), गोंदिया-कोल्हापूर ट्रेन (दि. १४/१६), नांदेड-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेस (दि. १४).