लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अकोला : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर रेल्वे विभागांतर्गत राजनांदगाव ते कळमनादरम्यान तिसऱ्या मार्गाला आमगाव रेल्वेस्थानक जोडण्यात येणार आहे. त्यासाठी ११ ते १४ ऑक्टोबरदरम्यान ‘नॉन इंटरलॉकिंग’चे काम केले जाणार असल्याने हावडा-मुंबई मार्गावरील ३५ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागणार आहे.
राजनांदगाव ते कळमनादरम्यान तिसऱ्या मार्गावर ७ ते १० ऑक्टोबरदरम्याना ‘प्री-नॉन इंटरलॉकिंग’चे काम केले जाणार आहे. त्यानंतर ११ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत ‘नॉन इंटरलॉकिंग’चे काम केले जाईल. यामुळे हावडा- मुंबई मार्गावरील मेल, एक्स्प्रेस आणि पॅसेंजर अशा एकूण ३५ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांची डोकेदुखी वाढणार आहे. मागील महिनाभरापासून रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक आधीच बिघडले असतांना प्रवाशांच्या त्रासात आणखी भर पडली आहे.
आणखी वाचा-नागपुरात ‘बायपास’ झालेले ह्रदयरुग्ण धावणार… काय आहे उपक्रम पहा…
रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये अकोला मार्गावर धावणाऱ्या तीन गाड्यांच्या सहा फेऱ्या रद्द झाल्या आहेत. त्यात ९ ऑक्टोबरला भुनेश्वर येथून सुटणारी १२८८० भुनेश्वर-कुर्ला एक्सप्रेस, ११ ऑक्टोबरला भुनेश्वर येथून सुटणारी १२८७९ कुर्ला-भुनेश्वर एक्स्प्रेस, १२ ऑक्टोबरला बिलासपूर येथून सुटणारी १२८४९ बिलासपूर-पुणे एक्स्प्रेस, १३ ऑक्टोबरला पुणे येथून सुटणारी १२८५० पुणे – बिलासपूर एक्स्प्रेस, १३ ऑक्टोबरला पोरबंदर येथून सुटणारी १२९४९ पोरबंदर-सांतरागाछी एक्सप्रेस, १५ ऑक्टोबरला सांतरागाछी येथून सुटणारी १२९५० सांतरागाछी – पोरबंदर एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे.