राज्यातील आदिवासी दुर्गम भागातील सुमारे ३५० विद्यार्थ्यांनी मेट्रोमधून प्रवासाचा आनंद लुटला. कस्तुरचंद पार्क, खापरी आणि झिरो माईल आणि फ्रीडम पार्कला भेट दिली. महाराष्ट्रातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडाराआदी जिल्ह्यातील एकल विद्यालयातील इयत्ता चौथी ते सातवीच्या विद्यार्थी नागपूर मध्ये सहलीसाठी आले होते. त्यांनी मेट्रोच्या प्रवासाचा आनंद घेतला.
हेही वाचा >>> नागपूर : ‘मटका’ उर्फ ‘लंबी रोटी’
प्रवासादरम्यान, खडीमार गावाची रहिवासी असलेल्या एकल विद्यालयातील इयत्ता ६ वी ची विद्यार्थिनी समिक्षा खलाल हिचा १२ वा वाढदिवस धावत्या गाडीत उत्साहात साजरा करण्यात आला. माझ्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा दिवस आहे,अशी प्रतिक्रिया समीक्षाने दिली. कस्तुरचंद पार्कपासून मुलांनी मेट्रोचा प्रवास सुरू झाला मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रवासादरम्यान मुलांना मेट्रोशी संबंधित माहिती दिली. आपण पहिल्यांदाच मेट्रो गाडी बघितली आणि यात प्रवास करून आपल्याला मजा आल्याचे एकल विद्यालय परतवाडा येथील इयत्ता चौथीचा विद्यार्थी कुणाल कासदेकर आणि आलापल्ली विद्यालयाची विद्यार्थिनी समिक्षा खेकरे यांनी सांगितले.