नागपूर : विदर्भातील पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या तीर्थक्षेत्र धापेवाडा येथे चंद्रभागा नदीचे खोलीकरण सुरू असताना त्यात ३५० वर्षांपूर्वीचे प्राचीन आणि पुरातनकाळातील कुंड सापडले आहे. या कुंडातून कोलबा स्वामी यांना विठ्ठल-रुख्माईची मूर्ती सापडली असल्याची आख्यायिका आहे.

हेही वाचा – ‘आरटीई’ प्रवेशाचे शासनाकडे १८०० कोटी थकीत, ‘आप’चे आंदोलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या संदर्भात धापेवाडा विठ्ठल मंदिराचे विश्वस्त आदित्य प्रतापसिंग पवार यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, धापेवाडा मंदिरातील दक्षिणेकडील भागात बाहुली विहिरी आहे, अशी आख्यायिका होती. त्या शोधण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होते मात्र कधीच पुरावा मिळाला नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासू केंद्र सरकारच्या माध्यमातून चंद्रभागा नदीला लागून असलेल्या घाटाच्या विकासाचे काम सुरू आहे. घाटाचे काम सुरू असताना तेथील माती बाजूच्या पात्रामध्ये टाकली जात होती. घाटाचे काम पूर्णत्वास आल्यानंतर तेथील माती उचलण्याचे काम सुरू होते. घाट जिथे संपला तेथून माती उचलत असताना तिथे कुंड मिळाले. या कुंडाला खाली लाकडी फ्रेम असून त्यावर दगडाचे बांधकाम आहे. कोलबा स्वामी महाराज यांना दुष्टांत झाला आणि त्यांना या कुंडात विठ्ठल रुख्मिणीची मूर्ती सापडली आसल्याची आख्यायिका असल्याचे पवार म्हणाले.