शहरातील शास्त्री वॉर्ड परिसरात असलेल्या एका घराच्या दरवाजाची चौकट खोदत असताना एक-दोन नव्हे तर चक्क ३९ साप एकामागून निघाले. या सापांची ३९ पिल्ले बाहेर येताना पाहून बघणारे सर्वच पुरते हैराण झाले. सोमवारी रात्री ६ तास चाललेल्या या बचाव मोहिमेदरम्यान घराच्या दारातील चौकटीतून मोठ्या प्रमाणात साप बाहेर येत असल्याचे पाहून कुटुंबीयांना धक्का बसला.

याबाबत माहिती देताना घराचे मालक राजेश सीताराम शर्मा यांनी सांगितले की, हे घर सुमारे २० वर्षे जुने आहे. मुख्य दरवाजाची लाकडी चौकट वाळवीच्या प्रादुर्भावामुळे कुजली होती. सोमवार, ९ एप्रिल रोजी घराची साफसफाई करत असताना मोलकरणीला एक सापाचे लहान पिल्लू दिसले, त्याला सुखरूप पकडून घराबाहेर काढण्यात आले. दरम्यान, दरवाजाच्या चौकटीच्या तळामध्ये तीन ते चार मुंडके दिसल्याने सापांची संख्या जास्त असेल या भीतीने घाबरलेल्या घरमालकाने सर्पमित्र बंटी शर्मा यांना घटनास्थळी पाचारण केले. या बचाव मोहिमेदरम्यान एकूण ३९ सापांची पिल्ले सुखरूप पकडून बाहेर काढण्यात आली. एका प्लास्टिक डब्यात त्यांना ठेवून त्यानंतर त्यांना जंगलात सोडण्यात आले.

Guhagar Anjanvel Jetty, Nine persons caught smuggling diesel, Ratnagiri, smuggling diesel,
रत्नागिरी : गुहागर अंजनवेल जेटीवर डिझेल तस्करी करणाऱ्या नऊ जणांना पकडले, दोन कोटीपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Farmer killed in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
Snake Bites Man Viral Video
जंगलात तब्बल ७ सापांशी खेळत होता तरुण, इतक्यात एकाने काढला फणा अन्…; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
Bangladesh citizens Ratnagiri, Anti-Terrorism Squad,
रत्नागिरीत तेरा बांगलादेशी घुसखोरांना पकडले, दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई

हेही वाचा >>>अकोला: सत्यपाल महाराजांकडून ‘त्या’ बाबाची पोलखोल, गरम तव्यावर बसण्याचे प्रात्यक्षिक; म्हणाले, “दैवी शक्ती, चमत्कार…”

बचाव मोहीम राबवणारे सर्पमित्र बंटी शर्मा यांनी सांगितले की, पकडलेली सर्व ३९ सापांची पिल्ले ‘अलुकिल्बेक’ (तास्या) साप प्रजातीची आहेत. हे साप विषारी नसतात. साधारणपणे अंड्यातून पिल्लू बाहेर आल्यावर मादी साप त्या ठिकाणाला सोडून निघून जाते. वास्तविक शास्त्री वॉर्डातील या घराच्या अंगणात जुनी नाली होती ती वापरात नव्हती. दरवाजाच्या चौकटीत एक लाकडी खांब होता तो जमिनीत शिरला होता. त्यामुळे सापाच्या पिल्लांना किडे माकोडे सहज खायला मिळायचे आणि या अन्नासाठी त्यांनी या चौकटीला आपली छावणी बनवली. सर्पमित्रांनी दरवाजाच्या चौकटीत साप दिसल्यावर हळूहळू चिमट्याने सुखरूप बाहेर काढले असता आतून अनेक साप बाहेर येऊ लागले.

हेही वाचा >>>बुलढाणा: अर्ध्यावरती डाव मोडलेल्यांचे पुनर्वसन; घटस्फोटित, विधवा-विधुर परिचय संमेलनाने सामाजिक क्रांतीचे बीजारोपण

बचावकार्य ४ तास चालले, ३९ सापांची पिल्ले पकडली गेली, यांची लांबी सुमारे २ फूट होती. हे नवजात साप दोन आठवड्यांपूर्वीच जन्माला आले असावेत, असे सर्पमित्र सांगतात. त्यांना पकडल्यानंतर एका डब्यात टाकून गोंदियाजवळील पांगडी जंगलात नैसर्गिक अधिवास असलेल्या नाल्याजवळ उघड्यावर भटकंतीकरिता सोडण्यात आले आहे.