अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी ३० जानेवारीला सकाळी आठ वाजतापासून १२४ मतदान केंद्रावर मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात होणार असून सहा जिल्ह्यातील ३९ हजारावर शिक्षक मतदार त्यांचा विधान परिषदेतील प्रतिनिधी या माध्यमातून निवडणार आहे.

हेही वाचा >>>संघाची सर्वसमावेशक भूमिका वैदिक हिंदू राष्ट्र निर्माणाचा ‘अजेंडा’; विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांची टीका

Thane district candidates withdraw, candidates election Thane, Thane,
ठाणे जिल्ह्यात ९० उमेदवारांची निवडणुकीतून माघार, जिल्ह्यात २४४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
nagpur total 717 candidates in arena with fadnavis and bawankule
फडणवीस, बावनकुळे, केदार, देशमुखांसह २१७ रिंगणात
Vasai Nalasopara Constituency, Vasai Nalasopara latest news, Vasai Nalasopara Constituency candidates,
वसई नालासोपारा मतदारसंघातून १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
bhandara pavani constituency tradition that the voters of this constituency rejected the existing mlas
भंडारा : विद्यमानांना नाकारण्याची परंपरा यंदाही कायम राहणार?
close race between Kamala Harris and Donald Trump in US election 2024
अमेरिकेत अध्यक्षपदासाठी डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात अभूतपूर्व चुरस! अधिक मते मिळूनही होऊ शकतो पराभव?
division of votes in vidarbha constituencies
विदर्भात मतविभाजनासाठी ‘उदंड झाले अपक्ष’; ‘हरियाणा पॅटर्न’ची चर्चा
Anis Ahmed, Anis Ahmed Congress, Anis Ahmed latest news, Anis Ahmed marathi news,
अर्ज भरण्याची वेळ चुकवणारे अनिस अहमद पुन्हा काँग्रेसमध्ये

पसंतीक्रमानुसार होणाऱ्या या निवडणुकीत एकूण २२ उमेदवार रिंगणात असले तरी माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले, शिक्षक परिषदेचे नागो गाणार व शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांच्यातच चुरशीची लढत आहे. २ फेब्रुवारीला अजनीतील सामुदायिक भवन येथे मतमोजणी होणार आहे. नागपूरसह पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या सहा जिल्ह्यांमध्ये मिळून एकूण ३९ हजार ४०६ मतदार आहेत. यात २२ हजार ७०४ पुरुष तर १६ हजार ७०२ महिला मतदारांचा समावेश आहे त्यांच्यासाठी सहाही जिल्हे मिळून १२४ मतदान केंद्रावर मतदानाची सोय करण्यात आली आहे. त्यात नागपूर जिल्ह्यातील ४३ केंद्रांचा समावेश आहे. रविवारी अजनी येथील सामुदायिक भवन येथून निवडणूक साहित्य घेऊन कर्मचारी त्यांच्या केंद्रावर रवाना झाले. सोमवारी सकाळी ८ वाजतापासून मतदानाला सुरुवात होईल. जिल्ह्यात २५० कर्मचाऱ्यांची सेवा अधिग्रहीत करण्यात आली आहे.

मतदारसंघातील यापूर्वीच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीच्या वळणावर गेली आहे. भाजप व महाविकास आघाडीने त्यांच्या उमेदवारासाठी संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. मोठ्या संख्येने अपक्षही रिंगणात आहेत. जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी रिंगणातील प्रमुख उमेदवारांनी त्यांची यंत्रणा कामी लावली आहे.

रिंगणातील उमेदवार

राजेंद्र झाडे (समाजवादी पक्ष युनायटेड), सुधाकर अडबाले (महाविकास आघाडी), नागो गाणार (भाजप समर्थित शिक्षक परिषद), सतीश जगताप (महाराष्ट्र विकास आघाडी पक्ष), प्रा. दीपकुमार खोब्रागडे (वंचित बहुजन आघाडी पक्ष), देवेंद्र वानखडे (आम आदमी पक्ष), निमा रंगारी (बहुजन समाज पक्ष), नरेश पिल्ले (विश्व हिंदू जनसत्ता बहुमत पक्ष), सतीश इटकेलवार, बाबाराव उरकुडे, रामराव चव्हाण, रवींद्र डोंगरदेव, नरेंद्र पिपरे, प्रा. प्रवीण गिरडकर, प्रो. सुषमा भड, राजेंद्र बागडे, डॉ. विनोद राऊत, उत्तमप्रकाश शहारे, श्रीधर साळवे, प्रा. सचिन काळबांडे, संजय रंगारी (सर्व अपक्ष)

हेही वाचा >>>नागपूर: देशात लोकशाही आहे असे म्हणणे बाळबोधपणा; सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांचे मत

असे आहेत मतदार
जिल्हा महिला पुरुष एकूण
नागपूर ९२५६ ७२२४ १६४८०
वर्धा २९६२ १९३२ ४८९४
भंडारा १२२५ २५७२ ३७९७
गोंदिया १२१८ २६६३ ३८८१
चंद्रपूर २६८४ ४८८७ ७५७१
गडचिरोली ६३० २५८१ ३२११
एकूण १६ ७०२ २२७०४ ३९४०६

मतदान केंद्रे
नागपूर- ४३
वर्धा- १४
भंडारा- १२
गोंदिया- १०
चंद्रपूर- २७
गडचिरोली- १८
एकूण- १२४

हेही वाचा >>>नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक

तर मतपत्रिका अवैध
निवडणुकीत पसंतीक्रमानुसार निवड प्रक्रिया राबवली जाते. रिंगणातील सर्व उमेदवारांना पसंती क्रमांक देता येतो. ज्यांना पहिल्या पसंतीचे मत द्यायचे आहे त्याच्या नावापुढे फक्त एक (१) हा आकडा मतदारांना टाकायचा असतो. एक आकडा घातलेला नसेल. एकापेक्षा अनेक उमेदवारांना पहिल्या पसंतीचे मते दिल्यास मत अवैध ठरते. मतदारांना फक्त जांभळ्या रंगाच्या स्केच पेनद्वारेच मतपत्रिकेवर पसंतीक्रम टाकायचा आहे. इतर पेन किंवा अन्य साहित्याचा वापर केल्यास मतपत्रिका अवैध ठरते. त्यामुळे शिक्षकांच्या या निवडणुकीत मतदारांनी योग्य पद्धतीने मतदान करण्याचे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.

मोबाईलला मज्जाव
मतदारांनी मतदान करायला जाताना सोबत मोबाईल फोन, पेन, पेन कॅमेरा, अन्य कोणतेही इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट घेऊन जाऊ नये. कोणत्याही आक्षेपार्ह वस्तूंना आत घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

शिक्षकांना नैमित्तिक रजा

निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी पात्र मतदार शिक्षकांना २० जानेवारी रोजी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना अनुज्ञ असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त ही रजा असणार आहे. ज्या ठिकाणी मतदान केंद्र आहे. त्याच शाळाना सुटी आहे. अन्य ठिकाणी नियमित शाळा सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.