नागपूर : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक कार्यालयाने सकारात्मकता दाखवून राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना सुखद धक्का दिला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या ३८५ पोलीस कर्मचाऱ्यांना थेट पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती दिली. त्यामुळे राज्य पोलीस दलात आनंदी-आनंद असे वातावरण आहे. पोलिसांची पदोन्नती रखडल्याबाबत ‘लोकसत्ता’ने वृत्तमालिका प्रकाशित केली होती, हे विशेष.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पोलीस महासंचालक कार्यालयाने २०१३ मध्ये राज्यभरातील पोलीस ठाण्यात कार्यरत कर्मचाऱ्यांची पोलीस उपनिरीक्षक पदासाठी पात्रता परीक्षा घेतली होती. त्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती गृहमंत्रालय आणि पोलीस महासंचालक कार्यालयाच्या अनुत्सुकतेमुळे रखडली होती. त्यामुळे ‘लोकसत्ता’ने वृत्तामालिका प्रकाशित करून पोलीस कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न लावून धरला होता. गेल्या दोन महिन्यांपूर्वी ३८५ पोलीस हवालदारांची पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड करण्यात आली होती. संवर्गसुद्धा मागण्यात आला होता. परंतु, पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नत्या रखडल्यामुळे सर्वच प्रक्रिया थांबली होती.

हेही वाचा – चंद्रपूर: रब्बी हंगामातील धान खरेदीचा मार्ग मोकळा; माजी मंत्री वडेट्टीवार यांची मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा

सोमवारी रात्री गृहमंत्रालयाने राज्यातील पोलिसांची खदखद लक्षात घेता पोलीस निरीक्षक ते सहायक पोलीस आयुक्त पदावर पदोन्नतीची यादी जाहीर झाली होती. त्यामुळे हवालदारांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला होती. आज मंगळवारी दुपारी ३८५ पोलीस हवालदारांच्या पदोन्नतीची यादी जाहीर करण्यात आली. त्यामुळे राज्यभरातील पोलीस हवालदारांमध्ये उत्साह संचारला आहे.

छायाचित्र – लोकसत्ता टीम

पदोन्नती मिळालेल्या सर्वच अधिकाऱ्यांना पहिल्या पसंतीक्रमानुसारच नियुक्तीसुद्धा देण्यात आली. कर्मचाऱ्यांची वर्दी बदलून आता अधिकाऱ्यांची वर्दी घालण्याची संधी मिळाल्यामुळे सध्या राज्यात पोलीस अमंलदार वर्गात आनंदाचे वातावरण आहे. पदोन्नतीची यादी जाहीर होताच अनेकांनी एकमेकांना अधिकारी झाल्याबद्दल शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला. पदोन्नती मिळालेल्या अंमलदारांना पदोन्नतीने नियुक्ती मिळालेल्या ठिकाणी त्वरित रुजू होऊन अहवाल सादर करण्याचे आदेश महासंचालक कार्यालयाने दिले आहेत.

हेही वाचा – नागपूर: नितीन गडकरींच्या कोणत्या मागणीला काँग्रेसचा पाठिंबा? नाना पाटोलेंचे पत्र कुणाला?

मुंबई-नाशिकचे सर्वाधिक अधिकारी

२०१३ मधून नवनियुक्त झालेल्या पोलीस उपनिरीक्षकांमध्ये मुंबई, नाशिक आणि ठाणे शहरातील सर्वाधिक अंमलदारांचा समावेश आहे. अधिकारी म्हणून निवड झालेल्या अंमलदारांना संवर्ग मागितल्यानंतर नियुक्ती रखडल्यामुळे पोलीस दलात नाराजीचा सूर होता. मात्र, पोलीस महासंचालक रजनीश शेठ आणि आस्थापना विभागाचे संजयकुमार सिंगल यांनी पाठपुरावा करीत सकारात्मकता दाखवून पदोन्नती यादी जाहीर केली.