लोकसत्ता टीम

नागपूर: महावितरणने नागपूर परिमंडळात २०२३- २३ या आर्थिक वर्षात ४ हजार ५० वीजचोऱ्या पकडल्या. यात बेकायदेशीर वीज वापर, वाढीव वीज भार, वीज वाहिनीवर आकडा टाकून वीजचोरीसह इतर प्रकरणांचा समावेश आहे. या वीजचोरीची रक्कम ७ कोटी २६ लक्ष ४४ हजार रुपये आहे.

महावितरणने पकडलेल्या वीज चोऱ्यांमध्ये वीज वाहिनीवर आकडा टाकून वीजचोरीची २ हजार २४ प्रकरणे, वीज मीटर मध्ये फेरफार आणि अन्य प्रकारच्या थेट वीजचोरीच्या १ हजार ६९२ प्रकरणांसह इतर प्रकरणांचा समावेश आहे. या सर्व प्रकरणांत भारतीय विद्युत कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. २०२३- २४ या आर्थिक वर्षात मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या नेतृत्वात नागपूर शहर, नागपूर ग्रामीण आणि वर्धा मंडळात वीजचोरी विरोधात आक्रमक भूमिका घेत सातत्याने छापेमारी करून वीजचोरीविरोधात मोहीम राबवली गेली.

आणखी वाचा-मेळघाटातील चार गावांचा मतदानावर बहिष्‍कार, कारण काय? जाणून घ्या…

उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह शहर नागपूर शहरात बेकायदेशीर वीज वापर, वाढीव वीज भार आणि चुकीच्या वीज दराची २६३, वीज वाहिनीवर आकडा टाकून वीजचोरीची १ हजार ३३१, वीज मीटर मध्ये फेरफार आणि अन्य प्रकारच्या थेट वीजचोरीच्या ७८९ प्रकरणांचा समावेश आहे. या सगळ्या प्रकरणातील वीजचोरीची रक्कम ४ कोटी ४६ लाख २१ हजार इतकी आहे. यापैकी १ हजार ५९३ ग्राहकांवर तडजोडीपोटी ५२ लक्ष ९२ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. तर १४६ वीजचोरांवर गुन्हे दाखल केले गेले. नागपूर ग्रामीण बेकायदेशीर वीज वापर, वाढीव वीज भार आणि चुकीच्या वीज दराची २२, वीज वाहिनीवर आकडा टाकून वीजचोरीची ५२६, वीज मीटर मध्ये फ़ेरफ़ार आणि अन्य प्रकारच्या थेट वीजचोरीच्या ३७१ प्रकरणांचा समावेश असून या वीजचोरीची रक्कम तब्बल १ कोटी ५४ हजार इतकी आहे. यापैकी ६०७ ग्राहकांवर तडजोडीपोटी १४ लाख ८३ हजारांचा दंड आकारण्यात आला आला.

आणखी वाचा-अरेच्चा! आधी पोटोबा, मग… मतदान थांबवून अधिकारी, कर्मचाऱ्यांची पंगत; यवतमाळच्या हिवरी मतदान केंद्रावर गोंधळ

वर्धेतही मोहिमेला गती

महावितरणने वर्धा जिल्ह्यातही वीजचोरांविरोधातील मोहिमेला गती दिली. येथे वर्षभरात बेकायदेशीर वीज वापर, वाढीव वीज भार आणि चुकीच्या वीज दराची ४९, वीज वाहिनीवर आकडा टाकून वीजचोरीची १४७, वीज मीटरमध्ये फ़ेरफ़ार आणि अन्य प्रकारच्या थेट वीजचोरीची ५३२ प्रकरणे उघडकीस आली. या वीजचोरीची रक्कम १ कोटी ७९ लक्ष ६८ हजार रुपये आहे. यापैकी ४९८ ग्राहकांवर तडजोडीपोटी १९ लाख ४६ हजाराचा दंड आकारण्यात आला.

Story img Loader