बुलढाणा:  उत्तर भारतातील दिल्ली, राजस्थान, हरियाणा, पंजाब मध्ये दहशत माजविणाऱ्या कुख्यात गँगस्टर नीरज बवानाच्या नावावर बुलडाणा येथील एका  व्यक्तीला तब्बल ४० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. खंडणी दिली नाही तर ‘गेम’ करण्याची धमकी देण्यात आली. या  खळबळजनक घटनेसंदर्भात आज ९ जुलैला असून अज्ञात आरोपी विरुद्ध बुलडाणा शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नागपूर: फडणवीस यांची कार्यकर्त्यांसोबत टपरीवर ‘चाय पे चर्चा’

बुलडाणा येथील केशव नगर भागात राहणारे ‘मुच्युअल  फंड डिस्ट्रिब्युटर’ पंकज अरुण खर्चे (वय ४२) यांनी आज रविवारी बुलडाणा शहर ठाण्यात फिर्याद दिली. प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध भादवि कलम ३८४, ५०६,५०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.  बुलडाणा पोलिसांच्या एका पथकाने आज सकाळी तक्रारदार पंकज खर्चे यांच्या घरी जाऊन आरोपिकडून लिहलेली चिठ्ठी ताब्यात घेतली.  परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यापूर्वी अज्ञात आरोपीने त्यांना काल ८ जुलै रोजी सायंकाळी उशिरा फोन करून  ४० लाख रूपये देण्याची तंबी दिली.’

हेही वाचा >>> अमरावती: पत्‍नीकडे वाईट नजरेने का पाहतो असे विचारून तरुणावर कोयत्‍याने वार

मला तुझी सर्व जन्म कुंडली माहीत आहे. जर पैसे दिले नाही तर तुझा मी गेम करून टाकीन, अशी धमकी देण्यात आली.  शनिवारी रात्री ८ वाजता पंकज खर्चे आपल्या घरी आले व जेवण करून झोपले. दरम्यान आज ९ जुलै रोजी खर्चे सकाळी  झोपेतून उठून अंगणात आले असता त्यांच्या कारच्या मागील बाजुचा काच फुटलेला दिसला. तसेच कार जवळ एक  चिठठी आढळून आली  चिठ्ठठीत  हिंदी मध्ये धमकी देण्यात आली आहे. ‘मैने तुझे फोन किया था, मैं निरज बवाना का राइट हैंड हु, मै तुम्हे ३ दिन का टाइम देता हु, ४० लाख रूपये दे और छुट जा, पैसे नहीं दिया तो तेरे घर में बिवी और तेरी २ बेटी रहती है, अशी धमकी या चिठ्ठीत देण्यात आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 40 lakh ransom demanded in the name of delhi gangster neeraj bawana in buldhana scm 61 zws
Show comments