अमरावती: दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे, संभाजीनगर, जालना, अहमदनगर या शहरांसाठी ४० तर जिल्हातंर्गत शहरांसाठी विशेष बस धावणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुधवारी ८ नोव्हेंबरपासून प्रवाशांसाठी विशेष बसची सोय केली असली तरी प्रवाशांच्या खिशावर बोजा पडणार आहे. गर्दीच्या कालावधीत राज्य परिवहन प्राधिकरणास ३० टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्यास मान्यता आहे. त्यानुसार दिवाळी हंगामात प्रवासी तिकीटदरात दहा टक्के वाढ करण्यात आली आहे. साधी व जलद या दोन्ही बससाठी प्रतिटप्पा ९ रुपये ६० पैशांनी (प्रवास तिकीट) आकारणी होईल. तसेच वातानुकूलित साधी, शयन आसनी, वातानुकूलित शिवशाही १३ रुपयाने आकारले जाणार आहेत.

हेही वाचा… अमरावती: विद्यार्थ्‍याचा प्राध्‍यापकावर प्राणघातक हल्‍ला

महिलांना तिकीटदरात ५० टक्के सवलतीमुळे या वर्षी प्रथमच दिवाळीकाळात महिला प्रवाशांची संख्या वाढणार आहे. भाऊबीज व दिवाळीला माहेरी जाण्यासाठी एसटीचा पर्याय असल्याने महिलांचा खर्च वाचणार आहे. पेक्षा अधिक वय ७५ असणाऱ्या वयस्कर प्रवाशांनाही मोफत बससेवेचा लाभ देण्यात येतो. यामुळे दरवर्षीच्या तुलनेत प्रवासी संख्‍या वाढण्‍याची शक्‍यता आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 40 special buses for the convenience of passengers during diwali however the ticket price has increased by ten percent amravati mma 73 dvr
Show comments