लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भंडारा : तुमसर तालुक्यातील येरली येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या विद्यार्थ्याना तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात तर प्रकृती गंभीर असलेल्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे की, येरली येथील आश्रमशाळेत सुमारे ४०० विद्यार्थी शिकतात. गुरुवारी सकाळी विद्यार्थ्यांनी अल्पोपहार घेतला. त्यानंतर दुपारी जेवण झाल्यावर सायंकाळी काही विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या आणि अतिसाराचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना तात्काळ तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले.

आणखी वाचा-गोसीखुर्द प्रकल्पाला निधीची प्रतीक्षाच; कामे साडेसातशे कोटींची, मिळाले अडीचशे कोटी

त्यांच्यावर प्रथमोपचार करून प्रकृती धोक्याबाहेर असल्याने सुटी देण्यात आली. त्यानंतर हळूहळू इतरही विद्यार्थ्यांना हा त्रास जाणवू लागल्याने त्यांना सुद्धा उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले.

यातील काही विद्यार्थ्याना त्रास वाढल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. आता सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 40 students poisoned at ashram school in yerali ksn 82 mrj