गडचिरोली : खाण क्षेत्राशी संबंधित नवे तंत्रज्ञान शिकण्यासाठी येत्या काही दिवसांत ४० आदिवासी विद्यार्थी ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. तीन वर्षांच्या पदवीनंतर या विद्यार्थ्यांना लॉयड मेटल्समध्येच काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती ‘लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक बी प्रभाकरन यांनी दिली.

नक्षलवादी आणि स्थानिकांच्या विरोधानंतरही सूरजागड टेकडीवर लोह खनिजाचे उत्खनन सुरू करण्यात आले. त्यानंतर बी प्रभाकरन यांनी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला.

Ursekarwadi, Dombivli, Skywalk staircase,
डोंबिवलीत उर्सेकरवाडीमधील स्कायवॉक जिन्याच्या पायऱ्यांवर प्रवाशांची घसरगुंडी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Committee to investigate Eklavya School case takes note of student protest
एकलव्य शाळेतील प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती, विद्यार्थी आंदोलनाची दखल
Home Schooling Education System
होम स्कुलिंग शिक्षण व्यवस्थेचे भविष्य ठरू शकेल का?
Tata Education Trust makes substantial provision for 115 employees Mumbai news
‘टीस’च्या कर्मचाऱ्यांना मार्च २०२६ पर्यंत दिलासा; टाटा एज्युकेशन ट्रस्टकडून ११५ कर्मचाऱ्यांसाठी भरीव तरतूद
yavatmal Adv Pranav Vivek Deshmukh graduated from London School of Economics
यवतमाळचा विद्यार्थी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत
Five children who escaped from observation home detained
निरीक्षण गृहातून पळालेली पाच बालके ताब्यात
Financial assistance, inter-caste marriages, eligible
आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना आर्थिक मदत, कोण ठरेल पात्र?

हेही वाचा – पहाटे उठून चावी फिरवून नागपूरकरांना पाणी देणारा ‘तो’ आहे तरी कोण?

सूरजागड लोहप्रकल्प गडचिरोलीचा कायापालट करणारा प्रकल्प ठरणार आहे. १९६० साली टाटा सारख्या कंपनीला परवानगी मिळूनही पायाभूत सुविधांअभावी टेकडीवर लोहखनिज उत्खनन करता आले नाही. ६० वर्षांनी का होईना अखेर येथे खनिज उत्खनन सुरळीत सुरू झाले. यामुळे येत्या काही दिवसांत गडचिरोलीसह महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राला नवसंजीवनी मिळेल असे प्रभाकरन म्हणाले.

स्थानिक आणि नक्षल्यांच्या विरोधावर पहिल्यांदाच बोलताना ते म्हणाले की, सुरवातीला नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे आम्हाला खाणीत कामाकरीता लोक मिळणे कठीण होते. पोलीस विभागाने दिलेल्या सुरक्षेच्या हमीमुळे आज आम्हाला काम पाहिजे म्हणून आसपासच्या गावातील शेकडो नागरिक खाणीवर येतात. स्थानिकांच्या सहमतिशिवाय आम्ही येथे कोणतेही काम करणार नाही. ३ दशलक्ष टनांवरून १० दशलक्ष टनांची परवानगी मिळालेली आहे. दुसरीकडे कोनसरी येथे कारखान्याचा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार आहे.

हेही वाचा – यवतमाळ : खून, प्राणघातक हल्ल्यात वाढतोय अल्पवयीन मुलांचा  सहभाग…

सध्या अडीच हजार कोटींची गुंतवणूक यात करण्यात आली असून ती २० हजार कोटींपर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात कोनसरी येथेच लोह उत्पादन घेण्याचा आमचा मानस आहे. यामुळे तब्बल २० हजार युवकांना रोजगार मिळणार. केवळ इतकेच नव्हे तर सध्या खाणीत कामाकरीता लागणारे प्राथमिक कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी टेकडीवरच केंद्र उभारण्यात आले आहे. यातून स्थानिक युवकांना रोजगारभिमुख प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात प्रभावित क्षेत्रातील जास्तीत जास्त युवकांना रोजगार मिळण्यास मदत होईल. प्रस्तावित ‘खाणपट्टा’ (मायनींग कॉरिडॉर) पूर्ण झाल्यास येथील नागरिकांची वाहतुकीमुळे होणाऱ्या जाचातून सुटका होणार आहे. असेही प्रभाकरन यांनी यावेळी सांगितले.

‘ऑस्ट्रेलया’तील कॅम्पस गडचिरोलीत आणणार

आर्थिक सुबत्ताच गडचिरोलीचे भाग्य बदलवू शकते. त्यात सर्वात मोठा वाटा खनिज संपत्तीचा आहे. परंतु खाण क्षेत्रात गतीने काम करण्यासाठी लागणारे शिक्षण सध्या आपल्या देशात उपलब्ध नाही. त्यासाठी सध्या ४० स्थानिक विद्यार्थी आम्ही ऑस्ट्रेलियातील कर्टन विद्यापीठात पाठवीत आहे. भविष्यात शासनाने परवानगी दिल्यास सामंजस्य कारारतून गडचिरोली येथे कर्टन विद्यापीठाचे कॅम्पस चालू करू शकतो. त्यासाठी माझे सतत्याने प्रयत्न सुरू असल्याचे प्रभाकरन यांनी यावेळी स्पष्ट केले.

Story img Loader