गणेशोत्सवादरम्यान महापालिकेने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तीच्या विक्रीवर आणि विसर्जनस्थळी अनेक र्निबध घातले. मात्र, त्याकडे महापालिका प्रशासनासह नागरिक आणि पर्यावरण संस्थांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. गेल्या दोन दिवसांत विसर्जनादरम्यान शहरातील विविध भागातील तलावातून गेल्या दोन दिवसात ‘पीओपी’च्या चार हजारांपेक्षा जास्त मूर्ती तलावातून बाहेर काढण्यात आल्या. त्यातील काही मूर्तीची जागेवरच मूर्तीकारांनी विल्हेवाट लावली. तर काही महापालिकेच्या आरोग्य विभागाने संकलित करून ठेवल्या आहेत. महापालिकेने ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तीबाबत केलेले दावे फोल ठरल्याचे दिसून येत आहे.
गणेशोत्सवापूर्वी महापालिकेने शहरातील विसर्जनाच्यावेळी जलाशयाजवळ चोख बंदोबस्त राहील, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ओळखणारे तज्ज्ञ राहतील, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती जमा करून कृत्रिम तलावात विसर्जन करतील, असे अनेक दावे केले होते. त्यासाठी त्यांनी जनजागृती केली होती. मात्र, त्यानंतर गेल्या दोन दिवसात चार हजारांच्यावर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तलावाबाहेर काढण्यात आल्या आहेत. त्यात सर्वात जास्त फुटाळा आणि अंबाझरी ओव्हरफ्लो या ठिकाणाहून मूर्ती काढण्यात आल्या आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूतीर्ंची ओळख पटविणारे शहरातील विविध भागातील तलावाजवळ उभे राहतील, अशी घोषणा करण्यात आली होती, प्रत्यक्षात अशी व्यवस्था कुठेच दिसून आली नाही. सोमवारी आणि मंगळवारी सकाळी शहरातील विविध भागातील तलावांतून चार हजारांच्यावर मूर्ती बाहेर काढल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर लाल रंगाची खूण करावी, कृत्रिम तलावामध्येच ती विसर्जित करण्याची अट घालून मूर्तींवर र्निबध लावले होते. शहरातील विविध भागातील तलावांत घरगुती अशा १ लाख २५ हजार मूतीर्ंचे विसर्जन करण्यात आले. त्यात चार हजारांपेक्षा जास्त प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आढळून आल्या आहेत. १३० कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली. मात्र, अनेकांनी त्यामध्ये मूर्ती विसर्जित न करता तलावात केल्या. शहरातील विविध तलावांच्या ठिकाणी पर्यावरण कार्यकर्ते नेमके कोणते काम करीत होते, असा प्रश्न विचारला जात आहे.
या संदर्भात आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर यांनी सांगितले, शहरातील विविध भागातील तलावातून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जित करू नका, असे आवाहन करण्यात आल्यानंतरही नागरिकांनी सहकार्य केले नाही. तलावाच्या ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची ओळख पटवणारे तज्ज्ञ ठेवण्यात आले. त्यांच्याकडून माहिती घेण्यात येणार आहे. ज्या पर्यावरण आणि सामाजिक संस्थांनी काम केली नाही अशांसाठी पुढीलवर्षी काही निकष ठरवून दिले जातील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा