नागपूर : आजाराला कंटाळून एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बजाजनगरमध्ये उघडकीस आली. रामरती दिनेश शाहू (४१) रा. कैकाडी नगर झोपडपट्टी असे मृत महिलेचे नाव आहे. रामरती यांनी २ नोव्हेंबरला घरी गळफास लावला. कुटुंबीयांनी त्यांना लगेच खाली उतरवून मेडिकल रुग्णालयात भरती केले. दरम्यान, सोमवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
गळफास घेण्यापूर्वी रामरती यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात ‘माझी मुलगी खूप समजदार आहे. ती आईशिवाय राहू शकते. मी खूप दिवसांपासून आजारी आहे. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे.’ असे नमूद केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तुर्तास अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
First published on: 09-11-2022 at 09:19 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 41 year old woman commits suicide due to sick for a long time zws