महेश बोकडे

नागपूर : राज्यात १ जानेवारी ते ३१ जुलै २०२३ या सात महिन्यांत दिवसाला ९३ अपघात घडले असून यात रोज ४२ नागरिकांचा मृत्यू तर ७८ जण जखमी झाले. परिवहन खात्याच्या नवीन अहवालातून ही माहिती पुढे आली आहे. या अहवालानुसार, राज्यात गेल्यावर्षी १ जानेवारी ते ३१ जुलै दरम्यान सात महिन्यांत एकूण १९ हजार ८६५ अपघातात ९ हजार २९२ मृत्यू तर १६ हजार १५४ नागरिक जखमी झाले होते. ही संख्या २०२३ मध्ये याच कालावधीत १९ हजार ७१९ अपघातात ८ हजार ९०७ मृत्यू तर १६ हजार ६५३ जखमी इतकी नोंदवली गेली. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी सात महिन्यात राज्यात अपघातांची संख्या व मृत्यू किरकोळ कमी झाल्याचे पुढे आले आहे. परंतु अपघाती जखमींमध्ये मात्र वाढ नोंदवण्यात आली आहे.

Uttarakhand Bus Accident News
Uttarakhand Bus Accident : उत्तराखंडच्या अल्मोडा दरीत बस कोसळून २३ प्रवाशांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
Loksatta anvyarth Ten elephants died in the Bandhavgarh tiger project in Madhya Pradesh
अन्वयार्थ: हत्तीएवढ्या दुर्लक्षाचे बळी
Number of people injured while bursting firecrackers on Diwali rises to 49 mumbai print news
दिवाळीत फटाके फोडताना जखमी झालेल्यांची संख्या ४९ वर
Pune hit and run case
पुण्यात पुन्हा हिट अँड रन! रस्त्यावर फटाके फोडणाऱ्याला भरधाव कारने दिली धडक; ३५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू
kudo millets elephants death
‘कोदो मिलेट’च्या सेवनाने तीन दिवसांत १० हत्तींचा मृत्यू; कारण काय? काय आहे कोदो मिलेट?
Boy dies after falling into water tank in park navi Mumbai
नवी मुंबई: आठ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू; उद्यानातील पाण्याच्या टाकीत पडला
Odisha diwali Two dead
ओडिशात आगीच्या भीषण घटना; दोन जणांचा मृत्यू, ५० जखमी

बुलढाणा, ठाण्यात अपघात वाढले, मुंबईत घट

बुलढाणा जिल्ह्यात १ जानेवारी ते ३१ जुलै दरम्यान सात महिन्यांत गेल्यावर्षीहून यंदा अपघाताची संख्या ७ ने वाढली. या अपघातात १८ मृत्यू तर ३० जखमी नोंदवले गेले. समृद्धी महामार्गावर अपघात वाढल्याने ही संख्या वाढली आहे. ठाण्यात अपघातांची संख्या नऊने कमी झाली, परंतु मृत्यू ७ तर जखमींची संख्या ३ ने वाढली. मुंबई शहरात अपघाताची संख्या ५२ ने कमी होऊन मृत्यू ३०, जखमींची संख्या ४८ ने कमी झाली. पुणे शहरात अपघाताची संख्या ४३ ने वाढून मृत्यू ८ तर जखमी ४३ ने वाढले. नागपूर शहरात अपघात ९ ने वाढून मृत्यू १२, जखमींची संख्या ५ ने वाढली आहे.

‘‘समृद्धी महामार्गावर खासगी बस जळून प्रवाशांचा मृत्यू झाल्याने तेथे अपघाती मृत्यूंची संख्या जास्त दिसत आहे. परिवहन खात्याने कारवाईसह जनजागृती मोहीम राबवल्याने गेल्यावर्षीहून अपघात कमी झाले आहेत. ही कारवाई आणखी प्रभावी केली जाईल.’’ – विवेक भिमनवार, परिवहन आयुक्त, मुंबई.