चंद्रपूर : मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीतील सरणावर ठेवला असता अचानक मधमाश्यांनी सहभागी नागरिकांवर हल्ला चढविला.

यात दोनजण गंभीर जखमी तर ४२ नागरिक किरकोळ जखमी झाल्याची घटना सिंदेवाही शहरात घडली. जखमींना तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मधमाश्यांनी हल्ला केल्याची ही दुसरी मोठी घटना आहे.

1.5 thousand people committed suicide in Vasai Bhayander in 5 years
५ वर्षात वसई, भाईंदर मध्ये दिड हजार जणांच्या आत्महत्या;२०२४ मध्ये गळाफास घेऊन सर्वाधिक आत्महत्या
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Taloja MIDC road accident
भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी
part of house collapse in Jogeshwari, house Jogeshwari,
जोगेश्वरीत घराचा भाग कोसळून पाच जण जखमी
Father murder by psychopath, Risod Taluka,
अकोला : मनोरुग्णाकडून वडिलांची हत्या, घरातच केले डोक्यावर वार
266 people died in road accidents in Raigad in year
रायगडमध्ये वर्षभरात रस्ते अपघातात २६६ जणांचा मृत्यू
27 goats die after drinking water in a cowshed near Barshi
बार्शीजवळ गोठ्यात पाणी प्यायल्यानंतर २७ शेळ्यांचा मृत्यू
One person died, eight injured , vehicle fell in valley,
ठाणे : वाहन दरीत कोसळून एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी

हेही वाचा – यवतमाळ : ऑनलाइन पैसे ट्रान्सफर केले, फसवणूक झाली पण..

सिंदेवाही शहरातील महाकाली नगरी परिसरात राहणाऱ्या राजू मार्तंडवार यांचे निधन झाले. स्मशानभूमीत सरण रचले गेले व विधी सुरू झाले होते. त्यानंतर पार्थिवाला अग्नी द्यायचा बाकी असताना मधमाशांनी हल्ला केला. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या नातेवाईक आणि इतर नागरिकांना पळता भुई थोडी झाली. यामध्ये महिला आणि लहान मुलं यांचीही पळापळ झाली.

हेही वाचा – धावत्या रेल्वेतून पडून एका वर्षांत ५२ प्रवाशांचा मृत्यू

मधमाश्यांनी हल्ला केल्याने काही नातेवाईक जखमी झाले आहेत. मधमाश्यांच्या हल्ल्यात ४२ जण जखमी झाले होते. मृतकाचे सरणावर रचलेले सरण तसेच ठेवून सर्वांनी मिळेल तिथे आसरा घेतला. या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले आहे. या हल्ल्यात चंदू श्रीकुंडवार, प्रदीप अटकापूरवार हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार चार वाजता करण्यात आले.

Story img Loader