पुणे-अमरावती आणि मुंबई-बल्‍लारशाह या मार्गावर रेल्‍वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्‍य रेल्‍वेने या मार्गावरून धावणाऱ्यादोन विशेष रेल्‍वेगाड्यांना मुदतवाढ देण्‍यासोबतच या गाड्यांच्‍या तब्‍बल ४२ फेऱ्या वाढविण्‍यात आल्‍या आहेत.

हेही वाचा >>> अमरावती : दिल्लीतून चोरलेल्या कारवर सांगलीच्‍या वाहनाचा क्रमांक, ई-चलान प्रणालीमुळे उलगडा

57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
17th November Latest Petrol Diesel Price
Petrol Diesel Price In Maharashtra : कुठे स्वस्त तर कुठे महाग, तुमच्या शहरांतील १ लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घ्या
Toyota has launched the special edition versions For year end
Toyota Year End Deals : टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच; कारच्या खरेदीवर मिळणार भरपूर अ‍ॅक्सेसरीज
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग
rickshaw owners drivers Acche Din assembly election campaign
प्रचार मिरवणूकांमुळे रिक्षा चालकांना अच्छे दिन, तीन ते चार तासांसाठी रिक्षा चालकांना मिळतात ५०० ते १ हजार रुपये

नोकरी, व्‍यवसायाच्‍या निमित्‍ताने अनेक वैदर्भीय पुणे येथे स्‍थायिक झाले आहेत. पुणे आणि अमरावती या मार्गावर रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेने ०१४३९ पुणे-अमरावती आणि ०१४४० अमरावती-पुणे या द्वि साप्‍ताहिक विशेष रेल्वेगाड्यांना नियोजित मुदतीनंतरही चालविण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे-अमरावती एक्‍स्‍प्रेस २९ सप्‍टेंबरपर्यंत चालणार होती, ती आता १७ नोव्‍हेंबरपर्यंत धावणार आहे. या कालावधीत या विशेष एक्‍स्‍प्रेसच्‍या १४ फेऱ्या वाढविण्‍यात आल्‍या आहेत. अमरावती-पुणे एक्‍स्‍प्रेस ३० सप्‍टेंबरपर्यंत चालणार होती, ती आता १८ नोव्‍हेंबरपर्यंत धावणार असून याही गाडीच्‍या १४ फेऱ्या वाढविण्‍यात आल्‍या आहेत.

हेही वाचा >>> रावणपुत्र मेघनाथाची एक नाही तर दोन-दोन मंदिरे; लोक म्हणतात, “नवसाला पावणारा…”

याशिवाय ०११२७ लोकमान्‍य टिळक टर्मिनस-बल्‍लारशाह साप्‍ताहिक विशेष एक्‍स्‍प्रेसच्‍या फेऱ्यांमध्‍येही वाढ करण्‍यात आली आहे. ही एक्‍स्‍प्रेस २६ सप्‍टेंबरपर्यंत चालणार होती. ती आता १४ नोव्‍हेंबरपर्यंत धावणार आहे. या गाडीच्‍या सात फेऱ्या वाढल्‍या आहेत. ०११२८ बल्‍लारशाह-लोकमान्‍य टिळक टर्मिनस २७ सप्‍टेंबरपर्यंत चालणार होती, ती आता १५ नोव्‍हेंबरपर्यंत धावणार आहे. या विशेष रेल्‍वेगाड्यांसाठी आरक्षणाची सुविधा ३० सप्‍टेंबरपासून सुरू करण्‍यात येणार आहे.