लोकसत्ता टीम
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
भंडारा : एका तरुणाने त्याच्या मित्राचीच ऑनलाइन ट्रेडिंगच्या नावाखाली ४३ लाख ४६ हजार ८२९ रुपयांनी फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली. याप्रकरणी तुमसर पोलिसांनी राधेश्याम हरिलाल बांधे (३० रा. राजनांदगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आणखी वाचा-५ वाघांचे एकत्र दर्शन, नागझिरा अभयारण्यातील पर्यटकांमध्ये आनंदाची लाट
तुमसर येथील इंदिरानगर येथे राहणारा अतुल जागेश्वर वाघमारे (३७) याने आरोपीच्या सांगण्यावरून ऑनलाइन ट्रेडिंगचे खाते तयार केले आणि त्याद्वारे पैसे गुंतवले. मात्र आरोपी राधेश्याम बांधे याने अतुलने दिलेल्या रकमेचे अमेरिकन डॉलरमध्ये रूपांतर करून संपूर्ण रक्कम काढून घेतली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अतुलने तुमसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
First published on: 18-11-2023 at 13:58 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 43 lakh fraud in the name of online trading ksn 82 mrj