नागपूर: महाराष्ट्रातील रेल्वे विकासाला आणखी गती देण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधांची निर्मिती वेगाने केली जात आहे. देशभरातील १३०९ स्थानकांचा पुनर्विकास करण्यासाठी अमृत भारत स्टेशन योजना सुरू करण्यात आली असून त्यात मध्य रेल्वेच्या एकूण ७६ स्थानकांचा समावेश आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील ४४ स्थानकांचा समावेश आहे. अमृतभारत स्टेशन योजनेंतर्गत, ही रेल्वे स्थानके एअर कॉन्कोर्स, वेटिंग रूम, एक्झिक्युटिव्ह लाउंज, फूड कोर्ट, लिफ्ट्स, एस्केलेटर यासारख्या जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज असतील. अपंगांसाठी अनुकूल सुविधा आणि भूमिगत पार्किंगसाठीही तरतूद करण्यात आली आहे. या स्थानकांवर शहर बस आणि इतर वाहतुकीसह मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी असेल. सौरऊर्जा, जलसंधारण आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था असेल.
‘ही’ स्थानके होणार विकसित
कांजूरमार्ग, परळ, विक्रोळी, अहमदनगर, दौंड, कोपरगाव, कुर्डुवाडी जंक्शन, लातूर, उस्मानाबाद, पंढरपूर, सोलापूर, आकुर्डी, कोल्हापूर, तळेगाव, भुसावळ विभाग – बडनेरा, मलकापूर, चाळीसगाव, मनमाड, शेगाव, बल्लारशाह, चंद्रपूर, धामणगाव, गोधनी, हिंगणघाट, काटोल, सेवाग्राम, नरखेड, पुलगाव, वडसा, गोंदिया, चांदाफोर्ट, औरंगाबाद, गंगाखेड, हिंगोली डेक्कन, जालना, किनवट, मुदखेड, नगरसोल, परभणी, परतूर, पूर्णा, सेलू, वाशिम, परळी वैजनाथ यांचा समावेश आहे.