बुलढाणा: एरवी इंग्रजी वा गणिताच्या पेपरला विद्यार्थी दांडी मारतात. मात्र मराठीच्या पेपरला शेकडो विद्यार्थ्यांनी दांडी मारण्याचा अजब प्रकार आज पहायला मिळाला. आजपासून दहावीच्या परीक्षांना सुरुवात झाली. आज पहिल्याच दिवशी सर्वात सोपा समजला जाणारा मराठीचा पेपर होता. यामुळे १५३ केंद्रावर शंभर टक्के हजेरी राहील, असा अंदाज नव्हे खात्री होती.
हेही वाचा >>> नागपूर : अग्निवीर भरतीसाठी आधी परीक्षा,नंतर शारीरिक चाचणी
मात्र आजच्या पेपरला तब्बल ४४० परीक्षार्थी गैरहजर असल्याचे आज संध्याकाळी उशिरा प्राप्त अहवालावरून स्पष्ट झाले. चिखली वितरण केंद्र अंतर्गतच्या परीक्षा केंद्रावरील ६९, देऊळगाव राजा अंतर्गत ५८ परीक्षार्थी गैरहजर होते. यामुळे शिक्षण विभागाचे अधिकारी व शिक्षक वृंदही चक्रावल्याचे वृत्त आहे.