लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बुलढाणा: लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलेले सिंदखेडराजा तहहसीलदार सचिन शंकरलाल जैस्वाल यांचा बंगला व निवासस्थानामध्ये तब्बल ४७ लाखांची रोकड सापडल्याचे खळबळजनक वृत्त आहे.

शुक्रवारी तहसीलदार जैस्वाल, शिपाई पंजाब ताठे, चालक मंगेश कुलथे यांना ३५ हजारांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले. यानंतर लाचलुचपत विभागाने वेगाने कारवाईची सूत्रे हलविली. बुलढाणा येथील कर्मचाऱ्यांच्या पथकाने जैस्वाल यांच्या सिंदखेडराजा स्थित शासकीय निवास स्थानाची झाडाझडती घेतली. तिथे नोटांचे ढीगच हाती लागले. त्याठिकाणी तब्बल ३७ लाख ५२ हजार रुपयांची रक्कम आढळून आली. त्यांच्या मूळ गाव असलेल्या परभणी येथील घराची परभणी एसीबी ने झडती घेतली असता तिथे ९ लाख ४० हजाराची रक्कम आढळून आली. पुढील तपासात आणखी मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी बोलून दाखविली.

आणखी वाचा-प्रचार पाण्यात! पावसाची रिपरिप प्रचाराच्या मुळावार, उमेदवार घरातच

यातील तक्रारदार यांचा वाळु वाहतुकीचा व्यवसाय असुन अवैधरित्या वाळु वाहतुक करण्यासाठी त्यांना ३५ हजाराची लाच मागण्यात आली. त्यांनी तक्रार केल्यावर विभागाने कारवाई केली.यानंतर मात्र मोठेच घबाड हाती लागले.सदर रक्कम जप्त करण्यात आली आहे. त्याच्याकडील इतर मालमत्तांचा शोध सुरू आहे. सिंदखेडराजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.