शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा म्हणून ओळख निर्माण झालेल्या वर्धा जिल्ह्याची ही ओळख पुसता पुसल्या जात नाही. केंद्र व राज्य शासनाचे कोटी कोटी रुपयाचे अनुदान, विविध योजना व सवलतींची भरमार झाली.मात्र शेतकऱ्यांचे दैन्य संपत नाही.यावर्षी जानेवारीत १०, फेब्रुवारीत ८, मार्च ११, एप्रिल १४, मे ३ व जून महिन्यात २ आत्महत्या झाल्याची नोंद आहे.
हेही वाचा >>> नागपूर : विवाहित प्रेयसीचे लैंगिक शोषण
जिल्हा प्रशासनाकडे मदतीसाठी ही प्रकरणे आली.त्यात सहा प्रकरणे मदतीस पात्र ठरली.तर बारा अपात्र ठरविण्यात आली असून तीस प्रकरणे विचारार्थ आहेत.आत्महत्या झाल्यानंतर त्या मागची कारणे शोधल्या जातात.पात्र ठरल्यास मदत मिळते.शेतकरी विविध समस्यांनी पिचल्या नंतर आत्महत्येसारखे पाऊल टाकतो.दरवर्षी या आत्महत्यांचा आकडा वाढतच चालला असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.अवकाळी पाऊस, नसैर्गिक आपत्ती, पिकांवरील रोग, सावकार तसेच बँकांचे वाढते कर्ज,अशी काही कारणे प्रामुख्याने दिली जातात.