महावितरणच्या उत्पन्नाच्या सुमारे ८० टक्के रक्कम वीज खरेदीवर खर्च होते. मात्र, ग्राहकांवर मोठ्या प्रमाणात थकबाकी असून वसुलीची अडचण आहे. राज्यात वीज ग्राहकांची बिलांची थकबाकी ७३,३६१ कोटींवर असून चंद्रपूर परिमंडळात ही थकबाकी ४९३ कोटींच्या घरात पोहोचली आहे. ग्राहकांनी वीज बिल भरावे अन्यथा विज जोडणी कापण्यात येईल, असा इशारा महावितरणकडून देण्यात आला आहे.
हेही वाचा >>>गडचिरोली : जमिनीच्या नियमबाह्य व्यवहाराला चाप बसणार काय?; भूमाफिया आणि अधिकाऱ्यांचे साटेलोटे
राज्यातील १५ लाख १९ हजार कृषीग्राहकांनी गेली पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ एकही बिल भरलेले नाही आणि त्यांच्याकडे २१,०६७ कोटी रुपये थकबाकी आहे. त्यापैकी ३ लाख २३ हजार कृषीपंपधारक ग्राहक आहेत. चंद्रपूर परिमंडळात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक, औदयोगिक, सरकारी कार्यालये, सार्वजनिक पाणिपुरवठा योजना व पथदिव्यांची थकबाकी २४२ कोटी ९० लाखाच्या घरात पोहेाचली असून कृषिग्राहकांनी थकबाकी न भरल्यामुळे ८१ हजारपेक्षा जास्त कृषिपंपांची थकबाकी ही २५० कोटी ७६ लाखाच्या घरात पोहेाचली आहे. चंद्रपूर परिमंडळात चालू वर्षातील व मागील वर्षाच्या एकंदरीत मागणीपैकी घरगुती ग्राहकांकडुन १३ कोटी ६८ लाख येणे आहे, तर वाणिज्यिक गाहकांकडुन ४ कोटी १२ लाख येणे आहे, औद्योगिक ग्राहकांकडुन ६ कोटी ६३ लाखांची थकबाकी आहे.
हेही वाचा >>>सावधान! गोंदिया गांजा विक्रीचा हब होतोय का?; तरुणाई कोरड्या व्यसनाच्या विळख्यात
ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजनांकडून ३ कोटी ४३ लाख तर ग्रामिण व शहरी पथदिवे यांच्याकडून २०८ कोटी ३१ लाख व कृषिपंपांच्या थकबाकीपोटी २५० कोटी ७६ लाख येणे आहेत. १५ वर्षांपासून १९ हजार ६६६ कृषिग्राहकांनी चंद्रपूर परिमंडळात ११२ कोटी ८० लाख भरले नाही. थकबाकीचा भरणा करुन महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांनी केले आहे.