बुलढाणा:  पाटबंधारे विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांच्या चारचाकी वाहनातून तब्बल पाच लाख  रुपयांची बॅग लंपास झाल्याने खळबळ उडाली आहे.खामगाव शहरातील नगर परिषद व्यापार संकुल समोरील जय मातादी  झेरॉक्स केंद्रासमोर ही घटना घडली. खामगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अभियंता विजय चोपडे  यांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार चोपडे यांनी चुलत भावाचे दुकानावरुन  पाच लाखांची रक्कम घेऊन  एका बॅगमध्ये ठेवली. यानंतर आपल्या  चारचाकी वाहन( एमएच २८-एझेड- ३०३३) मध्ये बॅग ठेवून ते  चोपडे  मळा घाटपुरी येथे जाण्याकरिता निघाले.  त्यावेळी  जय मातादी झेरॉक्स दुकानासमोर उभ्या असलेल्या  नातेवाइक सोबत बोलण्याकरीता ते वाहनातून खाली उतरले.   दरम्यान अज्ञात चोरटयाने अज्ञात चोरट्याने  वाहनातील पाच लाख लंपास केली. तपास पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे करीत आहे.

Story img Loader