चंद्रपूर : श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठासाठी (एस.एन.डी.टी.) ५० एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासदंर्भातील शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला. विशेष म्हणजे शासन निर्णयाची प्रत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीच राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे स्वतः सुपूर्द केली. एस.एन.डी.टी. विद्यापीठासाठी जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री मुनगंटीवार यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहे.

मौजा विसापूर, ता. बल्लारपूर येथील सर्वे क्रमांक ४६६ मधील महापारेषण कंपनीच्या ताब्यातील भुसंपादीत जमिनीपैकी ५० एकर भुसंपादीत जमीन एस.एन.डी.टी. विद्यापीठाला प्रदान करण्यात आली आहे. एस.एन.डी.टी. विद्यापीठासाठी जमीन उपलब्ध व्हावी, यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून ५० एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे.

mahavikas aghadi release manifesto
महिलांना तीन हजार, मोफत बसप्रवास ते प्रत्येकी ५०० रुपयांत सहा गॅस सिलिंडर; मविआच्या जाहिरनाम्यात घोषणांचा पाऊस!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
Abhishek Lodha transferred 18 percent stake in the company to a charitable trust print eco news
आता लोढादेखील टाटांच्या दानकर्माच्या वाटेवर; धर्मादाय न्यासाला कंपनीतील १८ टक्के हिस्सा हस्तांतरित
sharad pawar ncp leader jayant patil slams ladki bahin yojana
लाडकी बहीण’मुळे सरकारची तिजोरी रिकामी – जयंत पाटील
maharashtra vidhan sabha election 2024 ,
बेलापूरच्या प्रचारात राम, कृष्ण, गजाननाचा गजर !
illegal godown of mandap materials on reserved plot for educational facility in dombivli
डोंबिवलीत पाथर्ली येथे पालिकेच्या शैक्षणिक सुविधेच्या आरक्षित भूखंडावर मंडप साहित्याचे बेकायदा गोदाम

हेही वाचा – नागपूर : मेडिकलमध्ये वरिष्ठ डॉक्टरच्या विरोधात लैंगिक छळाची तक्रार

नेताजी सुभाषचंद्र बोस डिजीटल मुलींची शाळा, बल्लारपूर येथे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई यांच्या माध्यमातून महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुलाचे लोकार्पण १० जून २०२३ रोजी मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. महर्षी कर्वे यांनी घरोघरी जाऊन दरमहा एक रुपया गोळा करून एस.एन.डी.टी विद्यापीठाला सक्षम केले. पहिले कॅम्पस पुणे येथे सुरू झाले. त्यानंतर मुंबई, श्रीवर्धन व चंद्रपूरमध्ये ज्ञानसंकुल सुरू करण्यात आले आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून महिलांना कौशल्यपूर्ण शिक्षण मिळण्यासाठी तसेच महिलांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण करण्यासाठी मुनगंटीवार आग्रही होते.

६४ प्रकारचे कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम या विद्यापीठाच्या माध्यमातून देण्यात येत असून विद्यापीठाच्या निर्मितीसाठी कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांनी तसेच त्यांच्या टीमने सातत्याने चंद्रपूरमध्ये भेटी दिल्या. बल्लारपूर-विसापूर मार्गावर ५० एकर जागेमध्ये ५६० कोटी रुपये खर्च करून, राज्यातीलच नव्हे तर देशातील महिलांना गौरव वाटेल, असे अप्रतिम विद्यापीठ तयार करण्यात येत आहे. ज्यांनी महिलांचा सन्मान वाढविला त्या सर्वांच्या ज्ञानाचा दीपस्तंभ प्रतिकाच्या रुपामध्ये त्या संकुलात लावण्यात येणार आहे. तसेच थोर महिलांची मार्गदर्शक मूल्ये पुतळ्यासह लावण्याची व्यवस्थादेखील करण्यात येणार आहे. महिलांच्या पारंपारिक खेळांसाठी वातानुकुलीत इनडोअर स्टेडियम येथे उभारण्यात येईल.

हेही वाचा – बुलढाणा : रविकांत तुपकरांनी भाजपामध्ये यावे, ‘या’ नेत्याने दिली ‘ऑफर’

मुनगंटीवार यांच्याकडून महसूलमंत्री यांचे आभार

चंद्रपूर येथे प्रस्तावित एसएनडीटी विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुल परिसरासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतः या शासन निर्णयाची प्रत मुनगंटीवार यांना विधिमंडळातील कार्यालयात वितरित केली. या गतीमान निर्णयासाठी विखे पाटील यांचा मनःपूर्वक आभारी आहे, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.