लोकसत्ता टीम

नागपूर : बदलत्या जीवनशैलीमुळे सर्वच वयोगटातील व्यक्तींमध्ये गुडघा आणि कमरेच्या खुब्याचे (हिप) समस्या वाढत आहे. त्यापैकी काहींना खुबा किंवा गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची गरज भासते. नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) अस्थिरोग विभागाने गेल्या दहा महिन्यात या शस्त्रक्रियांचे अर्धशतक पूर्ण केले आहे.

college youth died, bullet hit the divider in pune,
पुणे : बुलेट दुभाजकावर आदळून महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू, बुलेटच्या धडकेत पादचारी ज्येष्ठासह दोघे जखमी
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
only 43 percent patients benefited from Mahatma Phule Jan Arogya Yojana in nagpur
नागपूर : महात्मा फुले योजनेचा लाभ केवळ ४३ टक्के रुग्णांनाच! कारणे व लाभ जाणून घ्या…
bmc
मुंबई: वेतन प्रलंबित ठेवून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा रद्द, आरोग्य सेवा कोलमडण्याची शक्यता
13 year old girl stands again despite being paralyzed from waist down due to rare disease
दुर्मीळ आजारामुळे कंबरेपासून खालचा भाग निकामी होऊनही १३ वर्षीय मुलगी पुन्हा उभी राहिली!
Child dies after being strangled by cousin while pacifying crying
नाशिक : माती खातो म्हणून गळा दाबला गेला, अन्…
honey trap loksatta news
कराड: हवालाच्या तीन कोटी रुपयांवर दरोडा टाकण्यासाठी ‘हनी ट्रॅप’
GST tax of Rs 561 crore has evaded by submitting documents in name of fake company
पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी अखेर ‘नाना’ला २६ वर्षांनंतर अटक

मेयो रुग्णालयातील अस्थिरोग विभागाने आयुष्यमान अथवा महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून या शस्त्रक्रिया केल्या. खासगी रुग्णालयात या प्रत्यारोपणाला सुमारे अडीच लाखांचा खर्च लागतो. लाभार्थ्यांमध्ये उत्कृष्ट दर्जाचे इम्प्लांट (सांधे) टाकण्यात आले. त्यामुळे रुग्णशय्येवर आलेले कुणी रुग्ण चालू तर कुणी चांगल्या पद्धतीने बसू व उठू लागल्याने त्यांचे जीवन सुकर झाले आहे. लाभार्थ्यांमध्ये मागास व दुर्गम भागातील सिकलसेलसह इतर गरीब रुग्णांचाही समावेश आहे.

आणखी वाचा-पश्चिम बंगाल, ओडिशाजवळ कमी दाबाचा पट्टा, राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

जेव्हा संधिवात किंवा कोणत्याही दुखापतीमुळे असह्य गुडघेदुखी होते तेव्हा शेवटचा पर्याय म्हणजे गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया. मेयोचे अधिष्ठाता डॉ. संजय बिजवे आणि वैद्यकीय शिक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रयत्नानेच येथे शासकीय योजनेतून हिप आणि गुडघा प्रत्यारोपण वाढल्याचेही मेयो रुग्णालयातील अस्थिरोग विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. मोहम्मद फैजल म्हणाले. करोनाकाळात या शस्त्रक्रिया बंद पडल्या होत्या. परंतु आता त्याला गती दिल्याने गेल्या महिन्याभरातच १५ प्रत्यारोपण झाल्याची माहिती त्यांनी दिली.

ज्या रुग्णांना चालता येत नाही, प्रचंड वेदना होतात, दररोज वेदनाशमन औषधांचे सेवन करावे लागते आणि दैनंदिन कामे करण्यात अडचणी येतात अशा रुग्णांसाठी गुडघा व हिप प्रत्यारोपण शस्त्रक्रिया संजीवनी आहे. या प्रत्यारोपण शस्त्रक्रियांमध्ये यशाचा दर अधिक असतो. काही महिन्यांतच बहुतेक रुग्ण दैनंदिन कार्य करू शकतात. शस्त्रक्रियेनंतर व्यायामाला प्राधान्य देणे, सक्रिय जीवनशैली राखणे, वजन नियंत्रित राखणे तसेच वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. -प्रा. डॉ. मोहम्मद फैजल, अस्थिरोग विभाग (विभाग प्रमुख), मेयो रुग्णालय, नागपूर.