नागपूर : मतदारांचा मतदान प्रक्रियेत अधिकाधिक सहभाग वाढावा यासाठी नागपूर जिल्ह्यात ५० विशेष मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी ७ पासून मतदान सुरू झाले. आयोगाने लोकसभा निवडणुकी प्रमाणे विशेष मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. यात आदर्श मतदान केंद्र १४, महिला नियंत्रित मतदान केंद्र १३, युवा कर्मचाऱ्यांकडून नियंत्रित १३, दिव्यांग मतदारांकडून नियंत्रित १० मतदान केंद्रे असणार आहेत.

हेही वाचा…सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदानाचा हक्क बजावला..

सकाळी ७ ते ६ मतदानाची वेळसकाळी सात वाजतापासून मतदानाला सुरुवात होणार असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. मतदानासाठी इपिक व्यतिरिक्त १२ प्रकारची ओळखपत्रे ग्राह्य धरण्यात आली आहे.