शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा मुंबईत होत आहे. या मेळाव्याला जिल्ह्यातील सहाही आगारातून ५० ‘एसटी बसेस’आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना मात्र बसस्थानकात ताटकळत बसावे लागल्याचे चित्र होते.
हेही वाचा >>> वर्धा मार्गावरील डबलडेकर उड्डाण पुलांवरील फलक ठरतायत धोकादायक; तातडीने हटवण्याची मागणी
वाशिम आगारात आधीच ‘एसटी बस’ कमी आहेत. त्यातच शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जिल्ह्यातील सहाही आगारातील पन्नास ‘एसटी बसेस’ची नोंदणी करण्यात आल्याने बसस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढली आहे. मात्र, गाड्या कमी असल्याने प्रवाशांची तारांबळ उडत असून मन:स्ताप होत आहे. गाडीमध्ये जागा मिळविण्यासाठी प्रवाशांची एकच झुंबड उडत आहे. अनेकांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत असल्याचे दिसून आले. आरक्षित गाड्या सायंकाळी मुंबईकडे रवाना होणार आहेत.