लोकसत्ता टीम

गोंदिया : मुंबई हावडा रेल्वे मार्ग वरील राजनांदगाव-कळमणा दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम वेगाने पूर्ण होत आहे. या विभागातील गोंदिया स्थानक हा महत्त्वाचा आणि वर्दळीचा रेल्वे मार्ग आहे. रेल्वेचे कामकाज अधिक सुरळीत व्हावे आणि नवीन गाड्यांचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी नवीन रेल्वे लाईन बांधण्याचे काम केले जात आहे. यामुळे नवीन प्रवासी सुविधा वाढण्या बरोबरच प्रवासी गाड्यांची वक्तशीरपणा ही वाढेल. या अंतर्गत गोंदिया स्थानकावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या कामामुळे नागपूर विभागातून जाणाऱ्या ५० गाड्या वेगवेगळ्या तारखांना रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. याशिवाय काही गाड्यांचे थांबेही बदलण्यात आले आहेत.

गाडी गोंदिया- कटंगी-गोंदिया मेमू ही १२ दिवसांसाठी म्हणजेच २५ एप्रिल ते ६ मे २०२५ पर्यंत रद्द करण्यात आली आहे. तर गाडी रायपूर- इतवारी पॅसेंजर ४ मे २०२५ रोजी रद्द राहील आणि रायपूर इतवारी ही गाडी ५ मे पर्यंत रद्द करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ५ मे २०२५ पर्यंत गोंदिया इतवारी- गोंदिया पॅसेंजर ही गाडी सुद्धा रद्द करण्यात आली आहे. तसेच २ ते ६ मे पर्यंत गोंदिया- झारसुगुडा मेमू आणि ३ ते ७ मे पर्यंत ट्रेन झारसुगुडा- गोंदिया मेमू ही पण रद्द करण्यात आली आहे.

६ मे रोजी ट्रेन हावडा- ओखा एक्स्प्रेस, ४ मे रोजी ट्रेन (लोकमान्य तिलक टर्मिनल) एलटीटी- पुरी एक्स्प्रेस, २ मे रोजी ट्रेन अहमदाबाद – पुरी एक्सप्रेस, २ ते ४ मे दरम्यान, ट्रेन क्रमांक हावडा – सीएसएमटी मेल आणि ४ ते ६ मे दरम्यान सीएसएमटी- हावडा मेल रद्द करण्यात आली आहे. तसेच २ ते ६ मे पर्यंत बिहार राज्यातील बरौनी वरून सुटणारी बरौनी-गोंदिया आणि ३ ते ७ मे पर्यंत ट्रेन गोंदिया- बरौनी रद्द करण्यात आली आहे. ६ मे २०२५ रोजी गोंदिया-रायगड जनशताब्दी एक्सप्रेस आणि ५ ते ७ मे, ट्रेन रायगड-गोंदिया जनशताब्दी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. ४ मे २०२५ रोजी बिलासपूर-नागपूर वंदे भारत आणि ५ मे २०२५ रोजी नागपूर- बिलासपूर वंदे भारत रद्द करण्यात आली आहे.

तसेच ३ मे २०२५ रोजी भगत की कोठी -बिलासपूर आणि ५ मे रोजी बिलासपूर-भगत की कोठी रद्द करण्यात आली आहे. आणि ०३ मे रोजी शालिमार- मुंबई एलटीटी व २४ एप्रिल आणि १ मे रोजी ट्रेन कन्याकुमारी-बनारस तामिळ एक्सप्रेस आणि २७ एप्रिल आणि ४ मे २०२५ रोजी ट्रेन बनारस-कन्याकुमारी तमिळ एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.४ मे रोजी गया-चेन्नई सेंट्रल आणि ६ मे रोजी चेन्नई- गया एक्सप्रेस ही पण रद्द करण्यात आली आहे. गोंदिया रेल्वे स्थानका वरून जाणाऱ्या बहुतेक गाड्या मार्ग आणि थांब्यांमध्येही बदल करण्यात आले आहेत. अशी माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक दिलीप सिंग यांनी पत्रका द्वारे दिली आहे.